Friday, October 18, 2024
Homeक्रीडाBCCI च्या बैठकीत वातावरण तापलेलं, खेळाडू्ंनीच दिली सूर्याची साथ, मुंबई इंडियन्स कनेक्शन...

BCCI च्या बैठकीत वातावरण तापलेलं, खेळाडू्ंनीच दिली सूर्याची साथ, मुंबई इंडियन्स कनेक्शन समोर

भारतीय क्रिकेटच्या ‘गंभीर’ पर्वाला सुरूवात झाली आहे. टीम इंडियाचा हेड कोच म्हणून गंभीरसमोर श्रीलंका दौरा पहिला टास्क असणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने गुरूवारी टीमची घोषणा केलीय. यामध्ये टी-20 संघाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादव याची निवड केली गेली आहे. रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यावर टीमचा उपकर्णधार असलेला हार्दिक पंड्याकडे आता पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी येणार असं सर्वांना वाटत होतं.

जरी बदल झाला तरी शुबमन गिल याच्याकडे कर्णधारपद जाईल असंच वाटत होतं. मात्र टीम मॅनेजमेंटने सूर्यकुमार यादवची निवड केली. महत्त्वाचं म्हणजे हार्दिकचं उपकर्णधारपदही काढून घेण्यात आलं. हा निर्णय वाटतो तितका सोपा नव्हता. यावरून बीसीसीआयच्या बैठकीमध्ये वातावरणही तापलं होतं. मग सूर्याची कशी निवड झाली जाणून घ्या.

हार्दिक पंड्यासाठी सर्वात जास्त नुकसानकारक गोष्ट ठरली ती म्हणजे फिटनेस. पंड्या आता पूर्ण फिट आहे मात्र त्याच्या फिटनेसमुळे त्याला अनेकदा टीमबाहेर रहावं लागलं आहे. वन डे वर्ल्ड कप 2023 मध्ये पंड्या अर्ध्या स्पर्धेतून बाहेर पडला होता, आधीच तो बाहेर होता आणि फिट झाल्यावर त्याला वर्ल्ड कपसाठी संघात जागा मिळाली होती. इंडियन एक्स्प्रेसच्या एका वृत्तात असा दावा करण्यात आलाय की याबाबत थेट खेळाडूंचा सल्ला घेण्यात आलाय. यामध्ये अनेक खेळडूंनी सूर्याच्या कॅप्टनीमध्ये खेळण्यासाठी तयारी दर्शवली.

 

कॅप्टन निवडताना खेळाडूंना फोन केले गेले, सूया खेळाडूंसोबत जशी डील करतो ते खेळाडूंनाही आवडतं. सूर्याची बोलण्याची आणि इतर खेळाडूंसोबत वागण्याची पद्धत काहीशी रोहितसारखी आहे. हार्दिकला या निर्णयाची माहिती गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी दिली. हार्दिकला मुंबईचं कर्णधारपद देण्यात आलं त्यावेळी संपूर्ण स्पर्धेत टीमची कामगिरीही खराब राहिली होती. सूर्याच्या नेतृत्त्वात भारताने गेल्या नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 टी-20 मालिका जिंकली आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती.

हार्दिक पंड्यावर एकाचवेळी दोन मोठे दु:खाचे डोंगर कोसळ्याचं पाहायला मिळालं. हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ आले, हार्दिकला त्याची पती नताशाने घटस्फोट दिला. त्याच दिवशी श्रीलंकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली. त्यामध्ये त्याला कॅप्टन्सी सोडा पण उपकर्णधारपदी काढून घेतलं गेलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -