Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगज्याची भीती तेच घडले; सरकारने ही घोषणा करताच, शेअर बाजार चीतपट

ज्याची भीती तेच घडले; सरकारने ही घोषणा करताच, शेअर बाजार चीतपट

सकाळच्या सत्रात तेजीचे निशाण फडकवणाऱ्या शेअर बाजाराने आता मान टाकली. जवळपास 1200 अंकांनी बाजारा घसरला. निफ्टीमध्ये 241 अंकांची घसरण झाली. तर सेन्सेक्समध्ये 1,043 अंकांची घसरण दिसून आली. लाँग टर्म कॅपिटल गेन करात वाढ झाल्याने बाजारात एकच हाहाकार झाला. हा कर आता 12.50 टक्के करण्यात आला आहे. तो पूर्वी 10 टक्के इतका होता. त्यावर बाजाराने तात्काळ प्रतिकूल प्रतिक्रिया नोंदवली. बाजाराच्या या घसरगुंडीने गुंतवणूकदारांच्या हाती निराशा लागली.

 

शेअर बाजाराची प्रतिक्रिया

 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भाषण सुरु करताच शेअर बाजार तेजीत आला. सकाळी 11 वाजता निफ्टीने हिरवे निशाण फडकवले तर सेन्सेक्स पण रुळावर आले. सकाळी 11.10 मिनिटांनी सेन्सेक्समध्ये 180 अंकांची उसळी दिसली. सेन्सेक्स 80,682 अंकावर तर निफ्टी 24,546 अंकावर पोहचला. पण बजेट जस जसं पुढे सरकत गेले बाजाराच मूड बिघडला. बाजारात तेजीचे सत्र मंदावले. बाजार घसरणीकडे वळला. दुपारी 12 वाजेच्या आसपास सेन्सेक्समध्ये 199 अंकांची घसरण आली. तर निफ्टी मध्ये 52 अंकांची घसरण दिसली.

 

कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय

 

भांडवली नफ्यावर जो कर आकारला जातो त्याला भांडवली लाभ कर ( LTGB) म्हटल्या जाते. जेव्हा मालक, कंपन्यांमध्ये मालमत्ता हस्तांतरीत करण्यात येते. तेव्हा हा कर आकारण्यात येतो. जर सर्व भांडवली नफा कर आकारणीसाठी जबाबदार असेल तर दीर्घकालीन नफ्यासाठी कराचा दृष्टीकोन बदलतो. सरकार कॅपिटल गेन टॅक्स वाढविण्याची शक्यता पूर्वीपासूनच वर्तवण्यात येत होती. उद्योजकांच्या शिष्टमंडळाने हा कर कमी करण्याची वकिली केली होती. पण सरकारने हा कर वाढविण्याची घोषणा केली. हा कर आता 10 टक्क्यांहून 12.50 टक्के करण्यात आला आहे.

 

1200 अंकांनी बाजार धडाम

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे बजेट भाषण संपताच बाजाराने तीव्र प्रतिक्रिया दिली. बाजाराला मोठा झटका बसला. सेन्सेक्स 1237 अंकांनी दणकावून आपटला. बाजार 79,264 अंकावर घसरला. त्यानंतर ही त्यात घसरण दिसली. तर निफ्टीत थोड्यावेळापूर्वी 409 अंकांची घसरण दिसली. निफ्टी 24,099 अंकावर आला आहे. बाजाराला काही घोषणा रुचल्या नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातून काढता पाय घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -