Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रपतीच्या मृतदेहावर डोकं ठेऊन रडता, रडता नियती शांत झाली, 3 मिनिटांनी सगळेच...

पतीच्या मृतदेहावर डोकं ठेऊन रडता, रडता नियती शांत झाली, 3 मिनिटांनी सगळेच हादरले

विवाहाच्या सप्तपदीवेळी अनेक जोडपी सात जन्म एकत्र राहण्याचा संकल्प सोडतात. सात जन्माच माहित नाही, पण लग्न झाल्यानंतर फार कमी जोडपी अखेर पर्यंत एकमेकांची साथ निभावतात. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कदाचितच कोणी असं काही घडेल, याची कल्पना केली असेल. पण अशीच धक्कादायक, काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. एका पत्नीने शेवटपर्यंत पतीची साथ दिली. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन मिनिटात तिने प्राण सोडले. त्यानंतर घरातून एकाचवेळी दोघांच्या अंत्ययात्रा निघाल्या. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये घडलेली ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

 

आजारी असलेल्या 85 वर्षीय शंकर मंडल यांचा सोमवारी मृत्यू झाला. पतीच्या निधनाचा पत्नी नियती मंडलला मोठा धक्का बसला. पतीच्या मृतदेहावर डोकं ठेऊन रडत असताना 3 मिनिटातच नियतीचा सुद्धा मृत्यू झाला. त्या 68 वर्षांच्या होत्या. दोघांनी 50 वर्ष एकत्र संसार केला. भरतपूर पोलीस ठाणे क्षेत्रात भोल्टा गावात राहणाऱ्या शंकर मंडल यांचा 50 वर्षांपूर्वी नियतीशी लग्न झालं. दोघांनी सुखाने संसार केला. मुलं झाली, त्यानंतर नातवंडांना खेळवलं.

 

डिस्चार्ज देऊन त्यांना घरी पाठवलं

 

संपूर्ण भरलेलं कुटुंब होतं. कौटुंबिक जीवनात दोघे आनंदी होते. वाढत्या वयाबरोबर शंकर मंडल यांना आजारपणाने ग्रासल. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना भरतपुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. काही दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन त्यांना घरी पाठवलं.

 

छातीवर डोकं ठेऊन रडत होती

 

घरी आल्यानंतर एक-दोन दिवसात सोमवारी शंकर यांची तब्येत बिघडली. कुटुंबीय त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याआधी शंकर यांनी प्राण सोडले. पतीच्या निधनाचा धक्का नियतीला सहन झाला नाही. पतीच्या मृतदेहाजवळ बसून त्यांच्या छातीवर डोकं ठेऊन रडत होती. रडता रडता नियती अचानक शांत झाल्या. कुटुंबियांनी त्यांना धरुन उचललं. त्यावेळी नियतीच शरीर थंड पडलेलं. त्यांना लगेच रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी चेक केल्यानंतर नियतीचा मृत्यू झाल्याच सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -