Sunday, September 8, 2024
Homeइचलकरंजीआयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून पुरग्रस्त छावणीची पाहणी 

आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून पुरग्रस्त छावणीची पाहणी 

इचलकरंजी येथे पंचगंगा नदी पुराच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली असून पुराचे पाणी नागरी वस्ती मध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. शहरातील शेळके मळा बागवान पट्टी, मुजावर पट्टी, जुना चंदुर रोड (दुर्गा माता मंदिर) परिसर या ठिकाणी नागरी वस्तीमध्ये पुराचे पाणी येत असल्याने या ठिकाणच्या नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुरग्रस्त छावणीमध्ये स्थलांतरित होण्याच्या सुचना काल आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिलेल्या होत्या. सदर सुचनेनुसार काल सायंकाळपासून शेळके मळा या परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या वतीने सुरू केलेल्या श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथील पूरग्रस्त छावणीमध्ये स्थलांतरित होणेस सुरुवात केली होती.

कालपासून या छावणीत ४६ कुटुंबातील १९४ नागरिक आणि ६३ पशुधन ( जनावरे) स्थलांतरित झालेली आहेत. या ठिकाणी असलेल्या नागरिकांनची महानगरपालिका प्रशासनाकडून

उत्तम व्यवस्था करणेत आलेली आहे. सदर नागरिकांना सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत.

आज शुक्रवार दि.२६ जूलै रोजी या छावणीस आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या समवेत भेट देऊन नागरिकांशी संवाद साधताना घाबरून जाऊ नका महानगरपालिका प्रशासन आपल्या पाठीशी आहे असा दिलासा दिला.

यानंतर आयुक्त यांनी पंचगंगा नदी परिसर, शेळके मळा, मुजावर पट्टी, जुना चंदुर रोड, बौद्ध विहार परिसर, पि.बा.पाटील मळा, टाकवडे रोड याठिकाणी निर्माण झालेल्या पुर परिस्थितीची पाहणी करून सर्व अधिकारी कर्मचारी यांना सतर्कता बाळगणेच्या सुचना दिल्या.

यावेळी शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, सहा.आयुक्त केतन गुजर, आरोग्य अधिकारी डॉ, सुनिलदत्त संगेवार, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, विजय पाटील, महादेव मिसाळ,विनोद जाधव,यांचेसह अग्निशमन आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

नितिन प्रभाकर बनगे

माहिती व जनसंपर्क अधिकारी

इचलकरंजी महानगरपालिका

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -