Thursday, November 21, 2024
Homeजरा हटकेपावसाळ्यात शरीराला पौष्टिक असणारे एग चिकन सूप; घरी नक्की ट्राय करा

पावसाळ्यात शरीराला पौष्टिक असणारे एग चिकन सूप; घरी नक्की ट्राय करा

सूप म्हटलं, की हॉटेलमधील वाफाळता, बशीत ठेवलेला बाऊल, सूप स्पून, मस्त स्वाद… असं सगळं डोळ्यांसमोर येतं. सूप, मग ते व्हेज असो किंवा नॉनव्हेज, हा सर्वांचा आवडता असा पदार्थ आहे. पावसाळ्यात निरनिराळ्या भाज्यांचे सूप प्राशन करणे फायदेशीर ठरते. कारण या सुपामध्ये पोषण मूल्ये भरपूर असतात. काही पोषण मूल्यांच्या अभावामुळे सर्दी आणि फ्ल्यूसारखे आजार बळावतात. यावेळी या सूपचे सेवन करावे. चला तर मग आज पाहूयात एग चिकन सूप कसं बनवायचं.

 

एग चिकन सूप साहित्य

 

४ ते पाच चिकन चे पिसेस१५० मिली पाणी२ टी स्पून हळद२ टेबल स्पून तेल४ काळीमिरीसजावटीसाठी कोथिंबीरचवीनुसार मीठ१ लिंबू१ टेबलस्पून मिरची लसूण पेस्ट१ अंडे

 

एग चिकन सूप रेसिपी

 

१. प्रथम चिकन स्वछ धुवून घ्यायचे. त्यानंतर एका प्रेशर कुकरमध्ये तेल टाकून त्यावर काळीमिरीची भरड घालायची व मिरची लसूण पेस्ट घालून त्यामध्ये चिकनचे तुकडे घालून पाणी टाकावे. वरून चवी नुसार मीठ व हळद घालावे. कुकरचे झाकण लावून त्याला पाच ते सात शिट्ट्या काढायच्या.

 

२. हे सर्व मिश्रण एका भांड्यात काढून त्यात हळुहळू फोडलेले अंडे सोडायचे. आणि सतत ढवळत राहायचे. अंड शिजले की झाले आपले एग चिकन सूप तयार आहे. यात थिकनेस साठी काहीही घालायची गरज नाही.

3 . हे सूप एका बाउलमध्ये काढून त्यावर आवडीनुसार लिंबू पिळून काळीमिरी पूड घालावी. कोथिंबीरने सजवून गरमा गरम सर्व्ह करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -