ताजी बातमी ऑनलाईन टीम
गेल्या आठवड्यापासून पावसाने मोठा कहर केला होता. परिणामी जिल्ह्यातील नद्यांनी रुद्र रूप धारण केले होते. आणि पाणी पातळीत सातत्याने वाढ सुरू होती. हे पाणी अनेक वस्तींमध्ये शिरले होते.
आणि ही सातत्याने होणारी वाढ एक मोठे टेन्शन पूर्ण ठरलं होतं. दरम्यान आज सकाळी म्हणजेच रविवार दिनांक 28 रोजी थोडसं हलकं होताना दिसून आलं. होणारी वाढ दोन दिवस पावसाने उसंत घेतल्याने कमी झाली आणि आज सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत इंचा इंचाने पाणी उतरताना दिसून आले. ही दिलासादायक बाब पुरग्रस्तांना ठरली.
दरम्यान येथील परिस्थिती अजूनही भय इथले संपत नाही अशीच काहीशी अद्याप आहे.