इचलकरंजी
27 अश्वशक्तीखालील यंत्रमागासाठी प्रतियुनिट 1 रुपया 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी 75 पैशांची अतिरिक्त वीज सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रीमंडळ कॅबिनेटच्या बैठकीत सवलतीसाठी जाचक असणारी ऑनलाईन व ऑफलाईनची अट रद्द करण्यात आली आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्याने राज्यभराती यंत्रमागधारकांना त्याचा लाभ मिळणार असल्याचे या निर्णयाचा ताराराणी पक्षाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी व साखर वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यंत्रमागाच्या वीज सवलतीचा प्रश्न प्रदीर्घकाळापासून रखडलेला होता. वीज सवलत देण्याच्या घोषणाही सातत्याने झाल्या. परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नव्हती. सवलत मिळण्यासाठी असलेली ऑनलाईन व ऑफलाईनची जाचक अट रद्द करावी व सवलतीचा लाभ द्यावा अशी मागणी होत होती या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून मंगळवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत वीज सवलतीसाठीची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची अट रद्द करण्यात आली. या निर्णयाचे स्वागत करत ताराराणी पक्षाच्या वतीने कॉ. मलाबादे चौक आणि महात्मा गांधी पुतळा याठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत व साखर वाटप करुन जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ. राहुल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, सुनिल पाटील, राजगोंडा पाटील, चंद्रकांत पाटील, शेखर शहा, सतिश मुळीक, रमेश कबाडे, बाळाहेब कलागते, नरसिंह पारीक, बंडोपंत लाड, अभय काश्मिरे, संजय केंगार, राहुल घाट, इम्रान मकानदार, सुभाष जाधव, श्रीरंग खवरे, राजू बोंद्रे, नितेश पोवार, नंदू पाटील, महावीर कुरुंदवाडे, राजू देसाई, अनिल बमण्णावर, अरुण निंबाळकर, रमेश पाटील, शैलेश गोरे, किशोर पाटील, आनंदा नेमिष्टे, दीपक केंगार चंद्रकांत इंगवले, पांडुरंग सोलगे, राजू माळी, भारत बोंगार्डे, बिलाल पटवेगार, फहिम पाथरवट, श्रीशैल बिळ्ळुर, सागर कम्मे, शशिकांत नेजे, अविनाश कांबळे, दीपक कांबळे, तानाजी कोकितकर आदींसह ताराराणीचे पदाधिकारी, आवाडे समर्थक उपस्थित होते.