Thursday, October 3, 2024
Homeआरोग्यविषयकया वेळेत केळी खा आणि आजारांपासून लांब राहा

या वेळेत केळी खा आणि आजारांपासून लांब राहा

केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम असते, ज्यामुळे आपल्या स्नायूंमध्ये क्रॅम्प येत नाही. केळीमध्ये कार्बोहायड्रेट आढळते, जे आपल्या शरीराला ऊर्जा देते आणि आपल्याला कमी थकवा जाणवतो. व्यायामापूर्वी केळी खाल्ल्यास जास्त थकवा जाणवत नाही.

केळीमध्ये पोषक तत्वे आढळतात
केळ्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी आणि मॅग्नेशियम आढळतात, याशिवाय व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-बी6, थायामिन, रिबोफ्लेविन देखील असतात. केळीमध्ये ६४.३ टक्के पाणी, १.३ टक्के प्रथिने, २४.७ टक्के कार्बोहायड्रेट असतात.

केळी खाण्याचे फायदे

1. अशक्तपणा दूर होतो

केळीमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असते. ते खाल्ल्याने पोट लवकर भरते. ऑफिस किंवा कॉलेजला जाण्यामुळे सकाळचा नाश्ता चुकला असेल तर केळी नक्की खा, कारण केळी खाल्ल्याने झटपट एनर्जी मिळते.

2. डिप्रेशनपासून आराम

केळीचे सेवन केल्याने लोकं डिप्रेशनपासून लांब राहतात. रुग्णांना देखील यामुळे आराम मिळतो हे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. केळ्यामध्ये असे प्रोटीन आढळते, ज्यामुळे तुम्हाला आराम वाटतो. यामुळेच डिप्रेशनचा रुग्ण जेव्हा केळी खातो तेव्हा त्याला आराम मिळतो.

3. बद्धकोष्ठता पासून आराम

केळीमुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तुम्ही दररोज रात्री झोपताना दुधासोबत केळीचे सेवन करू शकता. असे केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठता आणि पोटातील गॅसच्या समस्येपासून आराम मिळेल.

4. पचन सुधारणे

केळ्यामध्ये आढळणारे फायबर पचनक्रिया योग्य ठेवते. योग्य पचनशक्ती असण्याचा परिणाम म्हणजे तुम्ही सर्व आजारांपासून दूर राहता.

केळी खाण्याची योग्य वेळ

ब्रेकफास्टनंतर केळीचे सेवन करु शकता. केळी खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी ८ ते ९.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -