Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकऱ्यांच्या खात्यात १६९८ कोटी रुपये जमा

शेतकऱ्यांच्या खात्यात १६९८ कोटी रुपये जमा

या दोन्ही योजनांचे मिळून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १ हजार ६९८ कोटी ७० लाख रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

 

राज्यात पीएम किसान योजना राज्यात १ डिसेंबर २०१८ पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर राज्य शासनानेही ३० मे २०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना राबविण्यास मान्यता देऊन त्याप्रमाणे योजनेची सुरुवात केली.

 

या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबांचे (पती-पत्नी व त्यांचे १८ वर्षांखालील अपत्य) लागवडीलायक एकूण धारण क्षेत्र २ हेक्टरपर्यंत आहे. अशा पात्र शेतकरी कुटुंबास २ हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन हप्त्यांत एकूण ६ हजार रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो. लाभार्थ्यांना द्यावयाच्या लाभाची गणना केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येते.

 

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेची जोड :

 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना राबविण्याचा निर्णय ३० मे २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना राबविण्यात येत आहे.

 

या योजनेतून प्रतिवर्ष रक्कम ६ हजार रुपये लाभ दर चार महिन्यांनी २ हजार रुपये अशा वार्षिक समान तीन हप्त्यात पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च यप्रमाणे २ हजार रुपये जमा करण्यात येत आहे.

 

पतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणी करणे, पात्र लाभार्थीना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. संनियंत्रणासाठी ग्राम, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

 

किसान सन्मान निधीसाठी ४ लाख ३४ हजार शेतकरी पात्र :

 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार ५१ शेतकरी पात्र आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात १ हजार ४५० कोटी ५० लाख रुपये जमा करण्यात आले असून आतापर्यंत बँक खात्यात १ हजार ४५० कोटी ५० लाख रुपयांचा लाभ जमा करण्यात आले आहे. आंबेगाव तालुक्यात ३६ हजार ९०३ शेतकऱ्यांच्या खात्यात १०९ कोटी ३० लाख रुपये, बारामतीत ५१ हजार २७ शेतकरी – १७३ कोटी ७० लाख, भोरमध्ये २४ हजार ९७० शेतकरी – ७७ कोटी, दौंडमध्ये ४२ हजार ६०६ शेतकरी – १४६ कोटी ५० लाख, हवेलीत १० हजार ५५१ शेतकरी – ४३ कोटी ५० लाख, इंदापूरमध्ये ४७ हजार ३२ शेतकरी – १६३ कोटी, जुन्नरमध्ये ५२ हजार ५८६ शेतकरी – १७३ कोटी ८० लाख, खेडमध्ये – ४४ हजार ५४५ शेतकरी – १४८ कोटी २० लाख, मावळमध्ये १७ हजार ५३२ शेतकरी – ५७ कोटी ५० लाख, मुळशीत १३ हजार १४७ शेतकरी – ५६ कोटी ५० लाख, पुरंदरमध्ये ३१ हजार ९४२ शेतकरी – ९७ कोटी ९० लाख, शिरूरमध्ये ५२ हजार ४५० शेतकरी – १७३ कोटी ४० लाख आणि वेल्हे तालुक्यात ८ हजार ७६० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३० कोटी रुपये थेट लाभ हस्तांतराद्वारे जमा करण्यात आले आहेत.

 

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून २४८ कोटींचा लाभ

 

जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ई-केवायसी, आधार संलग्न व भूमी अभिलेख नोंदी आदी सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. एकूण ४ लाख ३९ हजार ६५३ शेतकरी पात्र आहेत. त्यांच्या बँक खात्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून एकूण २४८ कोटी २० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

 

– संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणेशेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरिता केंद्र शासनाच्या वतीने ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजना आणि राज्य शासनाच्या वतीने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनांअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १ हजार ६९८ कोटी ७० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -