,कोल्हापुरात (Kolhapur)दोन दिवसापूर्वी आईच्या निधनाचे विरह सहन न झाल्याने उच्चशिक्षित भाऊ बहिणींनी दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्येपूर्वी भूषण कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी या भावंडांनी सेवाभावी संस्थांना सर्व मालमत्ता दान केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
या दोन्ही भावंडांनी आत्महत्या पूर्वी लिहिलेल्या(Kolhapur) सुसाईड नोटमध्ये ‘आई शिवाय जगू शकत नाही… चाललो आईकडे’ असं लिहिलं होतं. आईच्या प्रेमापोटी आत्महत्या केलेल्या या दोन्ही भावंडांची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
कोल्हापूर शहरातील नाळे कॉलनीत राहणारे भूषण कुलकर्णी हे कस्टम अधिकारी म्हणून तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते, तर भाग्यश्री कुलकर्णी यांनी कोल्हापूर शहरातील गोखले महाविद्यालय आणि राजाराम महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून सेवा बजावली होती. सध्या त्या वकिलीची प्रॅक्टिस करत होत्या. हे दोघेही बहिण-भावंडं आई पद्मजा कुलकर्णी याची सेवा करत होते. आईच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःच्या लग्नाचा विचार देखील केला नव्हता.
मे 2024 मध्ये या भावंडांच्या आई पद्मजा निळकंठ कुलकर्णी यांचा निधन झालं होतं, यानंतर एकटे पडलेले भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी हे दोघेही बहिण भाऊ नैराश्यात होते. अनेक जणांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही बहिण भाऊ आईच्या आठवणीतून बाहेर पडत नव्हते. अखेर या दोन्ही भावंडांनी भावानी राजाराम तलावात उडी घेत आयुष्याचा शेवट केला.
राजाराम तालावावर जनावरे चारण्यासाठी आलेल्या स्थानिकांना दोन मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले, ज्यानंतर त्यांनी राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कागदपत्रावरून दोघांची ओळख पटवली. या दोघाही भावंडांनी हाताला दोरी बांधून राजाराम तलावात उडी घेतल्याचे दिसून आले. त्याच बरोबर त्याच्या खिशात सुसाईड नोटही दिसून आली.
पोलिसांनी केलेल्या तपासात दोन महिन्यात कुलकर्णी भावंडांनी आपल्या घरातील अनेक वस्तू गरजूंना दिल्या होत्या. वापरातील कपडे सोडले तर घरात काही शिल्लक ठेवलं नव्हतं. या दोघांनीही अनाथ मुले, सामाजिक संस्थांना सढळ हाताने मदत केल्याचं समोर आलं.
नागपूर, सोलापूर, मुंबई, पुणे इथल्या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था पाळणाघरांसाठी आर्थिक पाठबळ दिलं होतं. या भावंडानी आई पद्मजा कुलकर्णी यांच्या नावाने ही मदत केल्याचे पोलीस तपासात समोर आलं. आईच्या मृत्यूनंतर वाई मधील एका संस्थेला त्यांनी 25 लाखांची देणगी दिल्याचं देखील उघड झालं आहे.