राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढील हप्ता १ कोटी २० लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे.
जवळपास कोट्यवधी शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे.
१ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या अकाउंटला दोन हजार रुपये जमा होणार आहे. सरकारने याबाबत आदेश दिले आहेत.राज्य सरकारने मंगळवारी याबाबत निर्णय दिला आहे. जून २०२३ मध्ये नमो शेतकरी योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या अकाउंटला प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये जमा होतात. या योजनेतून आतापर्यंत तीन हप्ते जमा करण्यात आले आहेत. या योजनेचा चौथा हप्ता पुढील दोन दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना राबवण्यात आली होती.पीएम किसानच्या १७ व्या हप्त्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला महासन्मान योजनेचा हप्ता देण्यात येणार आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या तिसरा हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांना दोन हप्त्यांचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत ९० लाख ८८ हजार ४२ शेतकऱ्यांना १७ वा हप्ता देण्यात आला होता. त्यामुळे आता तेवढ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे.