Saturday, December 21, 2024
Homeसांगलीसांगलीत विधानसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच; कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच, जयश्री पाटील यांचा...

सांगलीत विधानसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच; कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच, जयश्री पाटील यांचा निर्धार

सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. महिला काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तर मिरज विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट भाजपच्या विरोधात उमेदवार मैदानात उतरवणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरुन आहे.

 

सांगली विधानसभा मतदारसंघात (Assembly Constituency) निवडणुकीचे (Elections) पडघम वाजायला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी मिळेल असे दावे करायला सुरुवात केली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मिरज विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीच्या जोरावर भाजपच्या विरोधात देखील उमेदवार मैदानात उतरवणार आहे.

 

दुसरीकडे मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांना पराभूत करून या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न आहे. मिरजमधून शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव यांनी आपल्याला उद्धव ठाकरे पक्षाकडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी निश्चितपणे मिळणार असल्याचा दावा केला आहे.

 

सांगलीत काँग्रेसचं तिकीट कुणाला? जयश्री पाटील की, पृथ्वीराज पाटील?

सांगली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत आपण लढवणार आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे उमेदवारीची देखील मागणी केली असल्याचं सांगलीतील महिला काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी जाहीर केलं आहे. तसेच, काँग्रेस पक्षानं तिकीट दिलं नाही तर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जयश्रीताई पाटील यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे सांगलीतील विधानसभा उमेदवारीच्या जागेवरुन रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे देखील काँग्रेसकडून विधानसभेसाठी इच्छुक असून मागील विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांचा थोडक्या मतात पराभव झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -