Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगबदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी

बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी

शाळेतील 4 वर्षांच्या चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्याविरोधात सध्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. अक्षय शिंदे याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सध्या पोलिसांकडून अक्षय शिंदे याची कसून चौकशी सुरु झाली आहे. अशातच बुधवारी बदलापूरमध्ये अक्षय शिंदे राहत असलेल्या खरवई गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले. अक्षय शिंदे खरवईपासून काही अंतरावर असलेल्या एका चाळीत राहतो. ग्रामस्थांनी बुधवारी त्याच्या घरात शिरत कुटुंबीयांना बाहेर काढले आणि घरातील सामानाची तोडफोड केली. यानंतर गावकऱ्यांनी अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांना घरातून हुसकावून लावत गाव सोडण्यास भाग पाडले.

 

अक्षय शिंदे याचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील आहे. अक्षयचा जन्म खरवई गावात झाला होता. तो याठिकाणी असणाऱ्या एका चाळीत आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि एक भाऊ असे तिघेजण आहेत. अक्षयच्या कृत्यामुळे राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तो दहावीपर्यंत शिकला होता. यापूर्वी तो एका इमारतीचा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्यानंतर 1 ऑगस्टपासून तो बदलापूरच्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला होता. त्याने दोन चिमुरड्या मुलींना स्वच्छतागृहात नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

 

अक्षय शिंदेच्या घरात सापडली खेळणी

खरवईच्या ग्रामस्थांनी अक्षय शिंदे याच्या घरावर हल्ला चढवला तेव्हा त्याच्या घरात लहान मुलांची खेळणी सापडली. ही खेळणी नेमकी कुठून आली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. याबाबत एसआयटी पथकाकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे. बदलापूरमध्ये मंगळवारी नागरिकांकडून उग्र आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.

 

अक्षय शिंदेचे वकीलपत्र स्वीकारायला वकिलांचा नकार

२६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपी अक्षय शिंदेंचं वकीलपत्र स्वीकारायला कल्याणमधील वकिलांच्या संघटनेन नकार दिला आहे. अक्षय शिंदे याच्यासारखे नराधम कधीच तुरुंगाबाहेर येऊ नये म्हणून हा निर्णय घेत असल्याचे वकिलांच्या संघटनेने सांगितले. डीआयजी आरती सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील एसआयटीने पथकाने मंगळवारी बदलापूर पोलिसांकडून याप्रकरणाच्या तपसाची सूत्रे हाती घेतली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -