राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षा असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी असल्याशिवाय अकाउंटवर पैसे येत नाही. यामुळे केवायसी करण्यासाठी महिलांची बँकेत मोठी गर्दी होत असून महिलांचे हाल होत आहेत.
लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या योजनेसाठी महिलांनी दिलेल्या बँक अकाउंट केवायसी आवश्यक असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बँकांमध्ये महिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे. पहाटेपासूनच बँकांमध्ये केवायसी करण्यासाठी महिलांच्या रांगा लागत आहेत. शहादा, धडगाव तालुक्यात बँकांबाहेर मोठी गर्दी पाहण्यास मिळत आहे.
बँकेत एकाच टेबलावर केवायसीचे काम
बँकांमध्ये (Bank) महिला लाभार्थ्यांची त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मात्र ही केवायसी करण्यासाठी बँकांमध्ये फक्त एकच कर्मचारी असल्यामुळे याचा फटका आता सर्वसामान्यांना बसत आहे. बँक अधिकाऱ्यांनी ही केवायसीसाठी अधिकचे कर्मचारी नेमून महिलांच्या ई केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याची मागणी आता महिलांकडून करण्यात येत आहे.