Wednesday, March 12, 2025
Homeमनोरंजननरेशी मीना यांच्या लढ्याने बिग बी झाले प्रभावित, 1 कोटींचा प्रश्न…

नरेशी मीना यांच्या लढ्याने बिग बी झाले प्रभावित, 1 कोटींचा प्रश्न…

‘कौन बनेगा करोडपती 16’ या सोनी टीव्हीच्या क्विझ रिॲलिटी शो सध्या बराच चर्चेत आहे. या शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये राजस्थानच्या सवाई माधोपूर येथून आलेली 27 वर्षीय नरेशी मीना हिने फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंड जिंकला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी नरेशी मीना यांना खूप प्रेमाने हॉटसीटवर बसायला बोलावले. खरंतर, राजस्थानमध्ये राहणारी नरेशी मीना ब्रेन ट्युमरसारख्या आजाराने ग्रस्त आहेत. जेव्हा अमिताभ बच्चन यांना हे समजले तेव्हा ते तिच्या वागण्याने अतिशय प्रभावित झाले होते. ती आजारी असतानाही हसतमुखाने आयुष्य जगते, ते पाहून अमिताभही भारावले.

 

अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉटसीटवर बसलेल्या मीना यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे पूर्ण आत्मविश्वासाने उत्तर दिले. कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांना ती ज्या प्रकारे उत्तरे देत होती, त्यावरून आता मीना नरेशी आणि त्यांच्या जिंकण्याची जिद्द यात कोणीच येणार नाही, हे स्पष्ट झाले होते. यावेळी मीना नरेशी याची माहिती देणारा व्हिडिओ सर्वांसमोर सादर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये तिच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या आजाराबाबत मोठा खुलासा केला.

 

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मीना नरेशीने अमिताभ बच्चन यांना सांगितले, “सर, 2018 साली आम्हाला कळले की मला ब्रेन ट्यूमर आहे. मी 5 वर्षांपूर्वी 2019 मध्ये या ट्यूमरवर शस्त्रक्रिया देखील केली होती. या आजाराच्या उपचारासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. माझ्या उपचारांसाठी आईने तिचे दागिने विकले. पण सर्जरी करूनही डॉक्टर पूर्ण ट्यूमर काढू शकले नाहीत. हा ट्यूमर अतिशय नाजूक जागी आहे, जिथे आम्ही पुन्हा सर्जरी करू शकत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी प्रोटोन थेरपी सुचवली पण ती खूपच महागडी आहे. आणि भारतातील अवघ्या 2-4 हॉस्पिटल्समध्येच ती ट्रीटमेंट उपलब्ध आहे. त्या उपचारांचा खर्च सुमारे 25-30 लाख रुपये आहे’ असे तिने नमूद केले.

 

अमिताभही झाले भावूक

 

‘ या ट्रीटमेंटसाठी जे पैसे लागणार आहेत, ते जिंकण्यासाठी मी कौन बनेगा करोडपतीच्या प्लॅटफॉर्मवर आले आहे’ असंही तिने सांगितलं. तिची कहाणी ऐकून अमिताभ बच्चनही खूप भावूक झाले आणि म्हणाले, ‘ नरेशीजी, तुमच्या उपचारासाठी लागणाऱ्या प्रोटॉन थेरपीचा खर्च उचलण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. मला तुमचा सहाय्यक व्हायचे आहे, तुम्ही या शोमधून जितकी रक्कम जिंकाल ती तुमची असेल आणि तुमच्या उपचाराबद्दल खात्री बाळगा.’ असंही त्यांनी सांगितलं.

 

अमिताभ बच्चन यांनी केलं कौतुक

 

त्यानंतर नरेशी यांनी त्यांच्या मदतीबद्दल बिग बींचे आभार मानण्याचा प्रयत्न केला तेव्हा अमिताभ यांनी त्यांचे कौतुक केले आणि म्हणाले, “ आपल्या आजाराबद्दल राष्ट्रीय व्यासपीठावर उघडपणे बोलण्यासाठी खूप धैर्य लागते. तुमच्या संयमासाठी आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. मला खात्री आहे की तुम्ही या शोमधून चांगले पैसे जिंकून घरी जाल.” अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आज म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी नरेशी यांचा एपिसोड दाखवण्यात येणार आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -