Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंगमहाराष्ट्रावर शोककळा! नेपाळ बस दुर्घटनेत जळगावातील 27 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री शिंदे यांचे...

महाराष्ट्रावर शोककळा! नेपाळ बस दुर्घटनेत जळगावातील 27 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री शिंदे यांचे महत्वपूर्ण आदेश

नेपाळमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. महाराष्ट्रातील 40 पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस एका नदीपात्रात कोसळली. या अपघातात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. नेपाळमध्ये झालेल्या भीषण बस दुर्घटनेतील मृतांमध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील रहिवाशांचा समावेश आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. तसेच या अपघातातील मृतदेह वायुसेनेच्या विमानाने महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत.

 

नेपाळमधील बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील 24 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली. तसेच या अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी नेपाळ दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याची विनंती केली होती. आता या प्रकरणी आम्ही राज्याला सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले आहे.

 

त्यासाठी समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्यात आली आहे. तसेच राज्यातील मदत व पुनर्वसन विभागातील अधिकारी, केंद्रीय अधिकारी यांच्याशी सातत्याने संवाद साधत मदतीबद्दलही माहिती घेत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

 

मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आज हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत.

 

नेमकं काय घडलं?

नेपाळमधील तनहुन जिल्ह्यातून निघालेली एक बस नेपाळच्या प्रमुख महामार्गावरील मर्स्यांगडी नदीत कोसळली. शुक्रवारी (23 ऑगस्ट) सकाळी साडे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. नेपाळची राजधानी काठमांडूपासून १२० किलोमीटरवर पश्‍चिमेकडे अबुखैरेनी गावजवळ हा अपघात घडला. ही बस गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची होती. गोरखपूरच्या धर्मशाला बाजार भागात राहणारे सौरभ केसरवानी यांची पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर ही एजन्सी नोंदणीकृत आहे.

 

महाराष्ट्रातील काही भाविकांनी जवळपास चार महिन्यांपूर्वी नेपाळला जाण्यासाठी केसरवाणी ट्रॅव्हल्सच्या तीन बस बुक केल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ११० लोकांना घेऊन तीन बस प्रवास करीत होत्या. यापैकी जळगाव जिल्ह्यातील 40 ते 50 भाविक होते. या दुर्घटनेनंतर नेपाळमधील जवानांचे मदत पथकाने तातडीने मदतकार्य सुरु केले. यातील काही भाविकांना वाचविण्यात यश मिळाले. तर भाविक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -