Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट; मराठवाडा-विदर्भात तुफान पाऊस कोसळणार

महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट; मराठवाडा-विदर्भात तुफान पाऊस कोसळणार

पुढील 3-4 दिवस पावसाची अशीच स्थिती कायम राहणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय.

 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज (ता. 24) कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

मुंबईसह उपनगरातही आज पावसाचे पुनरागम होणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, कल्याण, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाताना काळजी घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलंय.

 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे नाशिक, जळगाव, नंदुरबार, या जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी छत्री-रेनकोर्ट घेऊनच बाहेर पडावे लागणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -