येथील वॉर्ड क्रमांक १९ मधील मुरदंडे मळा परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटिव्हीतही कैद झाली आहे. अशा घटना वारंवार घडत असून भागातील त्रस्त नागरिकांनी उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेत येत्या १५ दिवसांत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महानगरपालिकेतच भटकी कुत्री आणून सोडण्यात येतील, असा इशारा दिला आहे.
येथील मुरदंडे मळ्यात भटक्या कुत्र्यांकडून लहान मुलांवर सातत्याने हल्ल्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे मुलांना घराबाहेर एकटे सोडणे मुश्किलीचे बनले आहे. अशातच
सोमवारी दिडवर्षाच्या मुलावर अचानकपणे ७-८ कुत्र्यांनी हल्ला केला. मुलाचा आरडाओरडा ऐकून
नातेवाईक बाहेर आल्याने कुत्र्यांनी पलायन केले. या घटनांमुळे नागरिकांतून भिती व्यक्त होत आहे. या संदर्भात महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेत कैफीयत मांडली. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदन संगेवार यांनी, प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याची मोहिम सुरु असल्याचे सांगितले. येत्या १५ दिवसांत कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भटकी
कुत्रीच महापालिकेत आणून सोडू अशा इशारा दिला. यावेळी राजु बोंद्रे, अमित बियाणी सतीश मुळीक शितल मगदूम यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.