Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगप्रेग्नंट असल्याचे कळताच पहिला फोन कपिल शर्माच्या पत्नीला, भारती सिंहकडून मोठा खुलासा,...

प्रेग्नंट असल्याचे कळताच पहिला फोन कपिल शर्माच्या पत्नीला, भारती सिंहकडून मोठा खुलासा, म्हणाली, रात्रभर दारू आणि

भारती सिंह ही लाफ्टर शेफमध्ये दिसली. भारती सिंह हिने 2017 मध्ये हर्ष लिंबाचिया याच्यासोबत लग्न केले. भारती सिंह हिचा मुलगा लक्ष अर्थात गोला नेहमीच चर्चेत असतो. व्लॉगच्या माध्यमातून गोलाबद्दल सर्व अपडेट मिळतात. काही दिवसांपूर्वीच हे कर्जतला धमाल करताना दिसेल होते. भारती सिंह ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे.

 

नुकताच भारती सिंह हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये भारती सिंह हिच्याकडून मोठे खुलासे करण्यात आले. भारती सिंह हिने तिच्या प्रेग्नंसीबद्दल खुलासा केलाय. भारती सिंह म्हणाली की, मी पार्टी करत होते…मी बियर पित बसले होते…त्यावेळी मला एक प्रेग्नंसी टेस्ट किट दिसली मी ती किट माझ्याकडे ठेवली आणि रात्रभर पार्टी करून झोपले.

 

सकाळी उठून मी टेस्ट केली आणि परत झोपले. माझ्या लक्षात देखील नव्हते की, मी टेस्ट केली. मी नंतर बघितले तर माझी प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटिव्ह आली. मला काहीच सुचत नव्हते. मी सर्वात अगोदर कपिल शर्माच्या पत्नीला फोन केला, मी त्यांना सर्व गोष्ट सांगितली. कारण मी सकाळी टेस्ट केली आणि त्याच रात्री मी दारू पित बसले होते.

 

त्यानंतर मी डॉक्टरांना फोन केला. त्यांनी मला काही टेस्ट करण्यास सांगितल्या. डॉक्टरांनी मला सांगितले की, मी सात आठवड्यांची प्रेग्नंट आहे. मला त्यावेळी डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की, झाले ते झाले आता दारू वगैरे प्यायची नाही. मात्र, मला काही गोष्टींची खरोखरच त्यावेळी खूप जास्त भिती वाटली होती.

 

माझ्या प्रेग्नंसीमध्ये हर्षने माझी खूप जास्त काळजी घेतली. मी प्रेग्नंसीमध्ये सतत काम केले. मुळात म्हणजे तुमचा पती ज्यावेळी म्हणतो ना…तू कर काम मी तुझ्यासोबत आहे तर एक वेगळीच ताकद नक्कीच मिळते. हर्षने तिच ताकद मला देखील दिली. कारण जेंव्हा पती म्हणतो ना बाळाला काही झाले तर तुच जबाबदार आहेस तर एक महिला म्हणावे तसे काम प्रेग्नंसीमध्ये करू शकत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -