ताजी बातमी ऑनलाईन टीम
शनिवारी दिवसभरात कोरोनाचे बारा रुग्ण आढळून आले तर दोनजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधित आणि कोरोना बळींची संख्या वाढली असल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढू लागला आहे, त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे जिल्हावासियांच्या हिताचे आहे.आज दिवसभरात आढळून आलेल्या बारा
कोरोना बाधितांमध्ये करवीर तालुक्यात आणि इचलकरंजी नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे तर कोल्हापूर महानगरपालिका
क्षेत्रातील आठजणांचा आणि इतर जिल्ह्यातील दोन जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण २ लाख ६ हजार ७८८ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख ९५३ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर एकूण ५ हजार ७९८ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ३७ इतकी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाटला ( बारा बांधीत तर दोन जणांचा मृत्यू )
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -