Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्र20 किलो सोन्याच्या मुकुटासह लालबागचा राजाचं विसर्जन? अनंत अंबानींनी दान केलेल्या मुकुटाचं...

20 किलो सोन्याच्या मुकुटासह लालबागचा राजाचं विसर्जन? अनंत अंबानींनी दान केलेल्या मुकुटाचं काय झालं?

लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी अनंत अंबानीही यावेळी उपस्थित होते. लालबागचा राजा गणेश मंडळात प्रमुख सल्लागार पदावर ते आहेत. दरवर्षी लालबागचा राजाच्या विसर्जनाला लाखो गणेशभक्त हजेरी लावत असतात. गिरगाव चौपाटीवर तर लाखोंच्या संख्येने एक झलक पहायला मिळावी म्हणून लोक आधीपासून उपस्थित होते. अनंत अंबानी यांनी मंगळवारी रात्रीही मंडपात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं.

 

अंबानी कुटुंब नेहमीच गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करत असते. दरवर्षी ते नियमितपणे लालबागचा राजाचं दर्शन घेतात. शनिवारी रात्री मुकेश अंबानी, अनंत अबांनी, राधिका मर्चंट आणि श्लोका मेहता लालबागचा राजा मंडपात दर्शनासाठी पोहोचले होते.

 

दरम्यान बुधवारी सकाळी विसर्जन करण्याआधी लालबागचा राजा गणपतीचा सोन्याचा मुकूट काढून घेण्यात आला. व्हिडीओमध्ये विसर्जनाआधी मुकुटाचे भाग वेगवेगळे केले जात असल्याचं दिसत आहे. अनंत अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या या मुकूटाची किंमत जवळपास 20 कोटी रुपये आहे.

 

दरम्यान अंबानी कुटुंबाने त्यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थान अँटिलिया येथे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. यासाठी भव्य कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. “अँटिलियाचा राजा” म्हणून त्याला संबोधलं जात आहे. अनिल आणि टीना अंबानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. दीड दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान झाले होते.

 

रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी तसंच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून अँटिलियाहून चौपाटी बीचवर विसर्जनाच्या ठिकाणी जाताना दिसले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -