Tuesday, December 3, 2024
Homeमनोरंजनबिग बॉसमध्ये सूरज चव्हाणला नासक्या म्हणणाऱ्या वैभवने बाहेर आल्यावर सांगितलं सत्य, म्हणाला…

बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणला नासक्या म्हणणाऱ्या वैभवने बाहेर आल्यावर सांगितलं सत्य, म्हणाला…

वैभव चव्हाण हा बिग बॉसच्या घरात असताना तो A टीमकडून खेळत होता. त्यामध्ये अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेदार एकत्र खेळत होते.

 

बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये हे सगळे एकत्र खेळायचे. त्यावेळी एका टास्कदरम्यान वैभव हा सूरज चव्हाणला नासक्या म्हणाला होता. त्या टास्कवेळीच सूरज चव्हाण हा हिरो म्हणून पुढे आला होता. वैभव बाहेर आल्यावर त्याने दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना सूरज चव्हाणचे कौतुक केले.

सूरज सगळ्यात खतरनाक व्यक्ती हा सूरज आहे, त्याला गेम कळत नाही असं म्हणतात. हे मीसुद्धा आतमध्ये असतानासुद्धा बोलत होतो. पण जर तो गेम न कळता तो एवढं काही करू शकतो तर मग गेम कळल्यावर तो काय करेलं, असं वैभव चव्हाण म्हणाला.

सूरजला मी नॉमिनेट केलं होतं, पण त्यानंतर मी त्याला नॉमिनेट केलं नाही. हा रिअॅलिटी शो आहे, तो किती रियल आहे हे दिसलं. तो तेवढा स्ट्राँग आहे आणि तो टॉपमध्येही दिसेल असं म्हणत वैभवने सूरज चव्हाणचे कौतुक केले.

अरबाज आणि निक्कीमध्ये कोण टॉपमध्ये जाईल यावर बोलताना, दोघे एकमेकांना घेऊन डुबतील नाहीतर दोघांमधील एक जण कोणाचा तरी गेम करेल, हे मी दोघांनाही आतमध्ये असताना म्हटल्याचं वैभवने सांगितलं

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -