इचलकरंजी
इचलकरंजी फेस्टिवल 2024 अंतर्गत घेण्यात आलेल्या गौरी सजावट स्पर्धेत अभिषेक कुकडे यांनी तर घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेत विलीशा वेटे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या दोन्ही गटातील स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला.
नव्या रंगात आणि नव्या ढंगात सादर होत असलेल्या इचलकरंजी फेस्टिव्हल अंतर्गत यंदा गौरी सजावट आणि घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये शहर आणि परिसरातून अनेकांनी सहभाग घेत आकर्षक व मनमोहन सजावटीचे सादरीकरण केले. परीक्षकांनी योग्यरितीने परिक्षण करुन दोन्ही गटातील विजेत्यांची नांवे जाहीर केली. त्यामध्ये गौरी सजावट स्पर्धा : अभिषेक कुकडे (प्रथम), योगेश बावणे (द्वितीय), नंदिनी आळंदे (तृतीय), किरण रोकडे (चतुर्थ) आणि शुभांगी हजारे (पाचवा). तर घरगुती गणपती आरास स्पर्धा : विलीशा वेटे (प्रथम), भालचंद्र टाकवडे (द्वितीय), प्रमोद मोरे (तृतीय), समर्थ खरात (चतुर्थ), प्रशांत भियेकर (पाचवा) यांनी यश मिळविले.
आमदार प्रकाश आवाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे व फेस्टिव्हलच्या संयोजिका सौ. मोश्मी आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेतील विजेत्यांना सानिका आवाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी फेस्टिव्हलचे कार्याध्यक्ष अहमद मुजावर, सचिव चंद्रशेखर शहा, शंकर पोवार, नजमा शेख, गिरीजा हेरवाडे, मेघा भाटले, शितल सूर्यवंशी, सपना भिसे, मंगल सुर्वे, सीमा कमते, अंजुम मुल्ला, कोंडीबा दवडते, अक्षय हजारे, संग्राम सटाले, मुजम्मिल सय्यद, सत्येन राजमाने, अक्षय आळंदे यांच्यासह प्रेक्षक उपस्थित होते.