Wednesday, November 13, 2024
Homeब्रेकिंगमुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी NPS वात्सल्य योजना; जाणून घ्या, अर्ज करण्यापासून विड्रॉलपर्यंतची A...

मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी NPS वात्सल्य योजना; जाणून घ्या, अर्ज करण्यापासून विड्रॉलपर्यंतची A टू Z माहिती

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी NPS वात्सल्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला. दिल्लीसह देशातील 75 ठिकाणी योजनेचा एकाचवेळी शुभारंभ सोहळा पार पडला. मुलांच्या पेन्शनसाठी नव्या उपक्रमाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली. पण तुम्हाला ही योजना नेमकी काय आहे, हे माहितीय का? मुलांसाठी पेन्शन म्हणजे, नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरं कर या योजनेत मुलांच्या नावावर नॅशनल पेन्शन सिस्टिममध्ये गुंतवणुकीचा पर्याय देण्यात आला असून एक नवी योजनाच केंद्र सरकारनं जाहीर केली आहे. या योजनेला ‘NPS वात्सल्य योजना’ (NPS Vatsalya Scheme) असं नाव देण्यात आलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी या योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत पालक आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी निधी जमा करू शकतील. मूल 18 वर्षांचं झाल्यानंतर हे डीफॉल्टनुसार, NPS मध्ये बदललं जाईल. नेमकी ही योजना काय? जाणून घेऊयात सविस्तर…

 

किती पैसे गुंतवावे लागतील?

मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी या योजनेअंतर्गत गुंतवणूक आणि पेन्शन योगदानासाठी एक सोपा पर्याय उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक आधारावर 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. जास्तीत जास्त तुम्ही तुम्हाला पाहिजे तितकी गुंतवणूक करू शकता. जमा केलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याज उपलब्ध आहे, ज्यामुळे मुलांच्या भविष्यात मोठी रक्कम जमा केली जाऊ शकते

 

NPS वात्सल्य योजनेत कोण गुंतवणूक करू शकतं?

PFRDA द्वारे चालवली जाणारी ही दीर्घकालीन NPS वात्सल्य योजना अनिवासी भारतीयांसह सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. अल्पवयीन मुलांचे कायदेशीर पालक NPS वात्सल्य खातं उघडू शकतात. पात्रता निकषांनुसार, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्ती ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे, ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

 

NPS वात्सल्य योजनेच्या अटी

NPS वात्सल्य योजनेत गुंतवलेले पैसे 3 वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर जास्तीत जास्त तीन वेळा काढता येतात. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, शिक्षण, गंभीर आजार आणि अपंगत्वासाठी 3 वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर 25 टक्क्यांपर्यंत योगदान तीन वेळा काढलं जाऊ शकतं.

 

2.5 लाखांपेक्षा जास्त रकमेसाठी, 80 टक्के रक्कम वार्षिकी खरेदी करण्यासाठी वापरली जाते, तर 20 टक्क्यांपर्यंतची रक्कम एकरकमी म्हणून काढता येते. त्याच वेळी, 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम एकाच वेळी काढता येते.

 

NPS Vatslya अकाउंट कसं उघडावं?

NPS Vatslya अकाउंट प्रमुख बँका, पोस्ट ऑफिस, पेन्शन फंड इत्यादींमध्ये असलेल्या पॉईंट्स ऑफ प्रेजेंस (POP) आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म ई-NPS च्या माध्यमातून उघडता येतं. ICICI बँकेनं म्हटलंय की, एनपीएस वात्सल्य अंतर्गत काही मुलांची खाती नोंदवून त्यांनी ही योजना सुरू केली. नव्या ग्राहकांना त्यांच्या NPS वात्सल्य खात्यासाठी PRAN देखील जारी करण्यात आलं आहे. ऑनलाईन मोडद्वारे खातं उघडण्यासाठी, तुम्ही ही लिंक वापरू शकता

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -