Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजन5 चा विजेता ठरला? सूरज चव्हाण, अंकिता नव्हे तर 'हा' सदस्य मारणार...

5 चा विजेता ठरला? सूरज चव्हाण, अंकिता नव्हे तर ‘हा’ सदस्य मारणार बाजी, ‘तो’ फोटो चर्चेत

या शोच्या ग्रँड फिनालेबद्दल (Bigg Boss Marathi 5 Grand Finale) नवनवीन अपडेट्स येत आहेत, अशातच या शोचा विजेता कोण असणार, याबाबत एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

बिग बॉस मराठीतून आतापर्यंत पुरुषोत्तमदादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले, इरिना रुडाकोवा, आर्या जाधव, छोटा पुढारी घनश्याम दरोडे, वैभव चव्हाण, वाइल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुले आणि अरबाज पटेल हे स्पर्धक बाहेर गेले आहेत. सध्या घरात वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार आणि अभिजीत सावंत हे सदस्य आहेत. या आठ सदस्यांपैकी विजेता कोण असणार, याबाबतचा एक फोटो चर्चेत आहे.

 

आठ सदस्यांपैकी वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार यांचे एलिमिनेशन होईल. तर निक्की तांबोळी चौथी रनर-अप असेल, जान्हवी तिसरी रनर-अप असेल, सूरज तिसऱ्या क्रमांकावर असेल. अंकिता व अभिजीत यापैकी एक विजेता असेल. तो म्हणजे गायक अभिजीत सावंत होय. हाउसमेट्स स्टेटस अशा आशयाचा एक फोटो व्हायरल होत आहे.

 

या फोटोत दिसतंय की ६३ व्या दिवशी डबल एविक्शन होईल, त्यात वर्षा उसगांवकर व पंढरीनाथ कांबळे बाहेर जातील. त्यानंतर ६८ व्या दिवशी धनंजय पोवार एलिमिनेट होईल. निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर व अभिजीत सावंत हे टॉप पाच सदस्य असतील. त्यापैकी अभिजीत विजेता ठरेल.

 

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पण त्यापूर्वी सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्याने विजेता आधीच ठरल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -