या ऑक्टोबर महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये शारदीय नवरात्रीपासून दसरा आणि दिवाळीपर्यंतच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळं या काळात जर तुमची बँकांच्या संदर्भात काही कामं असतील तर ती लवकर उरकून घ्या अन्यथा तुम्हाला अचणींचा सामना करावा लागेल.
दरम्यान, ग्राहकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बँक महिना सुरू होण्यापूर्वीच बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये बँकांना 31 दिवसांपैकी 15 दिवस सुट्ट्या असणार आहेत. त्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्यांव्यतिरिक्त विविध सणांच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांमुळे ऑक्टोबरमध्ये बँक एक दिवस बंद राहणार आहे. त्याचबरोबर गांधी जयंती, दुर्गापूजा, दसरा, लक्ष्मीपूजा, काटीबिहू आणि दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या दिवशी बँकांना सुट्ट्या असतील.