Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रयेत्या २ ते ३ दिवसांत राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

येत्या २ ते ३ दिवसांत राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

पुण्यासह दक्षिण कोकणातील काही भागांत ढगाळ हवामान असल्याने पावसाची शक्यता आहे.

 

पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून माघारीस अनुकूल परिस्थिती

 

नैऋत्य मान्सून पश्चिम उत्तर प्रदेशच्या उर्वरित भागातून, मध्य प्रदेशातील आणखी काही भाग, पूर्व राजस्थानचा उर्वरित भाग, गुजरातमधील आणखी काही भाग आणि महाराष्ट्राच्या काही भागांतून पुढील २ ते ३ दिवसांत माघारी फिरण्यास अनुकूल परिस्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

 

आग्नेय बांगलादेश आणि शेजारच्या परिसरात ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’ घोंघावत आहे. त्याच्या प्रभावाखाली ४ ऑक्टोबरच्या दरम्यान उत्तर बंगालच्या उपसागरात आणि आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

 

‘या’ भागातून मान्सून माघारी फिरला

 

आज मान्सून संपूर्ण जम्मू आणि काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा- चंदीगड दिल्ली तसेच पश्चिम राजस्थानचा उर्वरित भाग, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानच्या काही भागातून माघा

री परतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -