ताजी बातमी ऑनलाइन टीम
इचलकरंजी येथील गावभाग मधील चावरे गल्ली परिसरात आज गुरुवारी माजी जि प सदस्य राहुल आवाडे यांच्याकडून कुपनलिका लोकार्पण करण्यात आली. सदरच्या कामाचा शुभारंभ माजी बांधकाम सभापती, इचलकरंजी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांच्या हस्ते करण्यात आला.
सदरच्या परिसरात गेल्या दहा वर्षापासून पाणी प्रश्न गंभीर बनत चालला होता. परिसरातील नागरिकांची ही बाब लक्षात घेऊन प्रामुख्याने या परिसरात कूप नलिका खुदाई करण्याचे काम आणि लोकार्पण करण्याचे काम राहुल आवाडे यांच्यामार्फत करण्यात येत असल्याचे यावेळी कलागते यांनी सांगितले.
दरम्यान या कामामुळे परिसरातील सर्वच महिला भगिनींसह नागरिकांतून प्रचंड समाधान व्यक्त करण्यात येत आहे.