Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानशेअर बाजार कोमात, 'ही' कंपनी जोमात, एका वर्षात 570 टक्क्यांनी रिटर्न्स; आता...

शेअर बाजार कोमात, ‘ही’ कंपनी जोमात, एका वर्षात 570 टक्क्यांनी रिटर्न्स; आता गुजरातमध्ये 200 कोटी गुंतवणार!

जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झालेला दिसतोय. कालच्या सत्रात गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये बुडाले. काही शेअर्सचे मूल्य कमी होत असले तरी दुसरीकडे काही कंपन्या मात्र चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर आरबीएम इन्फ्राकॉन या कंपनीने अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच या कंपनीने अत्पादनवाढीसाठी इतर कंपनीशी कोट्यवधींचा करार केला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये भविष्यात मोठ्या घडामोडी दिसू शकतात.

आरबीएम इन्फ्राकॉन या कंपनीने नेमकी काय घोषणा केली?

आरबीएम इन्फ्राकॉन या कंपनीने शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. या कंपनीने गुजरातमध्ये जामनगर आणि कच्छ येथे 15 मेगावॅट क्षमतेच्या उर्जानिर्मितीचा प्रकल्प उभा करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी या कंपनीकडून 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या कंपनीने इलेक्ट्रोलायझर्सच्या पुर्ततेसाठीक ग्रीनझो एनर्जी या कंपनीशी करारदेखील केला आहे. कंपनीने केलेल्या या घोषणांनंतर या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.

 

टप्प्याटप्प्याने प्रकल्प कार्यान्वित होणार

कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगनुसार हा प्रकल्प जानेवारी-मार्च 2025 मध्ये सुरु होणार आहे. हा प्रकल्प 18 महिन्यांत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होईल. आरबीएम इन्फ्राकॉमचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक जे बी मणी यांनी या प्रकल्पाविषयी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार या प्रकल्पासाठी सरकाररी यंत्रणांची परवानगी घेण्यासाठी कमीत कमी दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर या प्रकल्पावर काम चालू होईल.

1200 कोटी रुपयांची ऑर्डर बुक

आरबीएम इन्फ्राकॉनच्या नव्या प्रकल्पाला टप्प्याटप्प्यात लागू केले जाईल. कंपनीने सांगितल्यानुसार या कंपनीकडे सध्या 1,200 कोटी रुपयांच्या ऑर्डर बुक आहेत. या ऑर्डरसंदर्भात या वर्षाच्या डिसेंबरपासून पुरवठा चालू होईल.

 

एका वर्षात दिले 570 टक्क्यांनी रिटर्न्स

दरम्यान, शुक्रवारी सत्रादरम्यान, Rbm Infracon Limited या कंपनीचा शेअर पाच टक्क्यंनी वाढला. या शेअरमध्ये 49 अंकांची वाढ झाली. शुक्रवारी या कंपनीचा शेअर 1,029.80 रुपयांवर पोहोचला. या कंपनीच्या शेअरचे 52 आठवड्यातील सर्वोच्च मूल्य 1,029.80 रुपये आहे. तर 52 आठवड्यातील निचांकी मूल्य 161.25 रुपये आहे. गेल्या सहा महिन्यांत या कंपनीने आपल्ाय गुंतवणूकदारांना 71.63 टक्के तर गेल्या एका वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 570.44 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 869.25 कोटी रूपये आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -