Sunday, November 3, 2024
Homeनोकरीबँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ६०० रिक्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करायचा...

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ६०० रिक्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करायचा जाणून घ्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊयात.

महत्त्वाच्या तारखा

 

अर्ज करण्याआधी अधिसूचना वाचून घेण्याचे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे करण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी, या भरतीसाच्या अर्ज प्रक्रियेस सुरुवात केली जाणार आहे.या भरतीमध्ये अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना २४ ऑक्टोबर २०२४ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी Bankofmaharashtra.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या. तसेच जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यासाठी उमेदवारांनी याच लिंकवर जावे. ११ ऑक्टोबरला अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

 

पात्रता

 

ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे आणि त्यांना कामाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच त्या व्यक्तीला त्याच राज्याच्या/केंद्रशाशित प्रदेशातील स्थानिक भाषा यायला हवी.या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोगटात सूट दिली गेली आहे.याबाबत सर्व माहिती तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन घेऊ शकतात.

 

अर्ज शुल्क

 

बँक ऑफ महाराष्ट्रमधील या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला १५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.बँक ऑफ इंडियातील या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ९००० रुपयांची स्टायपेंड दिली जाणार आहे. त्याचसोबत त्यांना ट्रेनिंगदेखील दिले जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अ

र्ज करावेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -