Wednesday, October 16, 2024
Homeब्रेकिंगठरलं! रात्रीच आदेश निघाला, सेंट्रल हॉलमध्ये शपथविधीची लगबग सुरु; आचारसंहितेपूर्वीच महायुतीचे 7...

ठरलं! रात्रीच आदेश निघाला, सेंट्रल हॉलमध्ये शपथविधीची लगबग सुरु; आचारसंहितेपूर्वीच महायुतीचे 7 नेते होणार आमदार

राज्यातल्या विधानसभेसाठी मंगळवारी आचारसंहिता लागणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीची तयारीही सुरू असल्याची माहिती आहे. दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलला सात आमदारांचा शपथविधी होणार आहे. विधीमंडळतात उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे. सध्या विधीमंडळात शपथविधीची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपालांकडे सोमवारी फाईल पाठवण्यात आली. त्यानंतर रात्री उशीरा राज्यपालांनी याला मंजुरी दिली आहे.

 

भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपने संधी दिली आहे. शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे. आज हे सातही आमदार शपथ घेणार आहेत.

 

एकनाथ शिंदे यांच्याकडून हेमंत पाटील, मनीषा कायंदे यांचं पुनर्वसन

एकनाथ शिंदे यांच्याकडून हेमंत पाटील, मनीषा कायंदे यांचं पुनर्वसन करण्यात आले आहे. मनीषा कायंदे यांची नुकतीच टर्म संपली होती. आथा त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. हेमंत पाटील यांची उमेदवारी भाजपच्या दबावामुळं रद्द करावी लागली होती. शिंदेंकडून आणखी एका माजी खासदाराला विधानपरिषदेवर स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी भावना गवळींना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाच्या नेत्याला संधी

तर दुसरीकडे अजित पवार यांच्याकडून सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना आमदारकी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाच्या नेत्याला संधी देण्यात आली आहे. सांगलीचे माजी महापौर म्हणून इद्रिस नायकवडी यांनी काम केले आहे. तर पंकज भुजबळ यांना संधी देत ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी सुनेत्रा पवार आणि नितीनकाका पाटील यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. त्यामुळं विधानपरिषदेवर ओबीसी आणि मुस्लीम नेत्याला संधी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -