Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्रकोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय; होईल आर्थिक भरभराट,...

कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा ‘हे’ उपाय; होईल आर्थिक भरभराट, उत्तम आरोग्य लाभेल

शारदीय नवरात्री आणि विजयादशमी झाल्यानंतर वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे. यंदा कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबरला आली आहे. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अर्थात, कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहते, आर्थिक अडचणी दूर होतात. हे उपाय (Kojagiri Purnima 2024 Remedies) नेमके कोणते? जाणून घेऊया.

कोजागिरी पौर्णिमेला रात्री ‘या’ गोष्टी नक्की करा

1. कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी मंगल कलश नक्की स्थापित करा आणि त्याची पूजा करा, यामुळे घराची आर्थिक भरभराट होते.

 

2. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी, गणपती, विष्णू, चंद्र यांची पूजा करावी. जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता जाणवत असेल किंवा कष्टाने कमावलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल, तर हा उपाय फायदेशीर ठरेल.

.3 विष्णू सहस्त्रनाम, श्री सुक्त याचं पठण करा. याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.

 

4. रात्री चंद्राची, कुबेर देवाची विशेष पूजा करा. असे केल्याने देखील घरात पैशाची आवक कायम राहते, घरात श्रीमंती येते.

 

5. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर तयार करावी. रात्री चंद्राच्या प्रकाशात चांदीच्या भांड्यात खीर ठेवावी. यानंतर घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याला खाऊ घाला, यामुळे जुनाट आजार बरे होतात अशी मान्यता आहे.

 

6. आपल्या मोठ्या मुलाची किंवा मुलीची आरती करा, यामुळे घरात शांति टिकून राहते.

 

7. रात्री देवी लक्ष्म समोर 4 वाती तुपाचा दिवा लावा, असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील.

 

8. कोजागिरी पौर्णिमेला रात्रभर जागरण करतात, शक्य नसल्यास रात्री 1 वाजेपर्यंत जागरण करावं, यामुळे तुम्हाला मानसिक शांति लाभेल.

 

9. रात्री 12 वाजता सर्व देवतांची अवश्य पूजा करा, यानंतर गंगाजल शिंपडा. असे केल्याने तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल.

 

10. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हनुमानजींसमोर चारमुखी दिवा लावा. असे केल्याने आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते. यासोबतच नोकरी-व्यवसायात प्रगती होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -