Wednesday, December 18, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट

Election 2024 :  केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला होता. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची माहिती देत दिवाळीनंतर राज्यात निवडणुका होतील, असे संकेत दिले होते.

तसेच, केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी राज्यातील मतदारांची संख्या, पुरुष, महिला, तृतीयपंथी मतदार आणि मतदारांमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात माहिती देखील दिली होता. आता, नियोजित पत्रकार परिषदेतून आज राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निवडणुकांची घोषणा केली आहे.

गेल्या महिनाभरापासून राज्याचं लक्ष लागलेल्या निवडणुकांच्या घोषणेचा दिवस अखेर उजाडला असून महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे, आता दिवाळीनंतर पुन्हा एकदा दिवाळीसारखे फटाके फुटणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह झारखंड विधानसभा निवडणुकांचीही घोषणा केली आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.

20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर, 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. राज्यातील 288 मतदारसंघात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून याच महिन्यात 29 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे.

म्हणजे, 15 दिवसांतच उमेदवारांना अर्ज भरण्याची तयारी करावी लागणार आहे. त्यातच, काही दिवसांपूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघातील खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं होतं. त्यामुळे, येथील मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणुकीचीही घोषण करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांप्रमाणेच लोकसभा पोटनिवडणुकांचंही वेळापत्रक असणार आहे. त्यानुसार, 20 नोव्हेंबर रोजी मतदान व 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक

निवडणुकीचं नोटिफिकेशन – 22 ऑक्टोबर 2024
अर्ज भरण्याची तारीख – 29 ऑक्टोबर
अर्ज माघार घेण्याची तारीख – 4 नोव्हेंबर
मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर
मतमोजणी – 23 नोव्हेंबर
निवडणूक प्रक्रिया समाप्त – 25 नोव्हेंबर  2024

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -