इचलकरंजीपासून जवळच असलेल्या हातकणंगले-जयसिंगपूर रेल्वे रूळावर तारदाळ हद्दीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासह खूनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. सुनिलकुमार भगवानदास रावत असे त्याचे नांव आहे.
मयत – सुनिलकुमार पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून पुष्पराज गाडे याने तीन अल्पवयीनांसह सहा साथीदारांच्या मदतीने रावत याचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पुष्पराज रामसिंह गाडे (वय २१), संतोषकुमार जोगेश्वर सिंह (वय
१९), शिवेंद्र रामकुशन सिंह (वय १९) या तिघांना अटक केली असून अन्य तीन अल्पवयीन (सर्व रा. मध्यप्रदेश) यांना जयसिंगपूर येथून ताब्यात घेतले आहे.