Homeराजकीय घडामोडीमहाराजांचे मंदीर, 25 लाखांचा विमा ते मोफत शिक्षण, ठाकरेंच्या वचननाम्यात घोषणांचा पाऊस;...

महाराजांचे मंदीर, 25 लाखांचा विमा ते मोफत शिक्षण, ठाकरेंच्या वचननाम्यात घोषणांचा पाऊस; कोणकोणती आश्वासनं दिली?

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुती यांचे जाहीरनामे प्रसिध्द करण्यात येत आहेत, अशातच प्रत्येक पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिध्द करण्यात येत आहेत. आज(गुरूवारी) शिवसेना ठाकरे गटाच्या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी मुंबईकरांच्या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे.

 

यावेळी बोलतना शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, ‘काही दिवसात महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित होईलच पण काही बारीक-सारी गोष्टी अशा आहेत. ज्या शिवसेनेच्या जाहीरनाम्यात दिलेले आहेत असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील कोळीवाडे आणि गावठाण त्यामध्ये कोळी बांधव आले काही गावठाण यांच्याकडे आता सरकारची वाकडी नजर गेलेली आहे. या कोळीवाड्यांच्या क्लस्टर विकास किंवा डेव्हलपमेंट करण्याचं घाट त्यांनी घातलेला आहे. क्लस्टर म्हणजे काय ते सगळं एकत्रित करायचं त्यांना टॉवर बांधून द्यायचे आणि बाकीची जमीन ही त्यांच्या मित्राला त्याच्या घशात घालायची असा हा एक काळा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे पहिला प्रथम त्यांनी केलेला जीआर आहे तो रद्द करू कोळीवाड्यांचं अस्तित्व यांची ओळख हे आम्ही कदापी पुसू देणार नाही. या सर्वांना मान्य होईल असाच विकास आम्ही त्या ठिकाणी करू असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटल आहे.

 

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, त्याचबरोबर धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबईभर एक बकालपणा आणण्याचा सरकारचा डाव आहे. तो देखील आम्हाला हाणून पाडायचा आहे आणि तो आम्ही हाणून पाडणार. धारावीमध्ये चार-पाच लाख वस्ती असेल त्यातली अर्धी अधिक हे अपात्र ठरवून मुंबईत इतरत्र फेकून द्यायची दहिसर मिठागर या ठिकाणी पाठवायचे धारावीकरांना धारावी सोडायची नाहीये आणि बाकीच्यांना देखील समजत आहे की, नागरी सुविधांवर ताण पडणार आहे. आत्ताच निविदाप्रमाणे किंवा निविदाबाह्य सवलतीप्रमाणे धारावीचा विकास करण्याचा ठरवलं. तर, मुंबईकरांवरती मुंबईच्या नागरी सुविधांवरती मोठा भार पडेल जर कॅल्क्युलेशन तर हजारो एकर जमीन ही आजच आदानींना दिलेली आहे त्याच्यात असे आदेश निघालेले आहेत, सरकारचा हा डाव हाणून पाडायचा असल्याचं उध्दव ठाकरेंनी म्हटलं आहे.

 

संस्कार

 

प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार.

 

अन्नसुरक्षा

 

शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवणार.

 

महिला

 

महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार.

प्रत्येक पोलीस स्टेशन बरोबरीने स्वतंत्र २४x७ महिला पोलीस ठाणे सुरु करणार.

अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार.

 

आरोग्य

प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार.

 

शिक्षण

जात-पात-धर्म-पंथ न पहाता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार.

 

पेन्शन

 

सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार.

 

शेतकरी

‘विकेल ते पिकेल’ धोरणानुसार बळीराजाच्या पीकाला हमखास भाव मिळवून देणार.

 

वंचित समूह

वंचित समूहांच्या हक्कांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार.

 

मुंबई

धारावीकरांना त्यांच्या उद्योगांच्या सोयींसह राहतं घर तिथल्या तिथे देणार.

मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक व औद्योगिक केंद्र उभारणार.

 

उद्योग

बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार. निसर्ग उध्वस्त करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरणस्नेही उद्योगांना प्रोत्साहन देणार.

 

शिवसेना ठाकरे पक्षाच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?

संस्कार

 

प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे, प्रेरणादायी मंदिर उभारणार.स्वराज्यावरील आक्रमणे व अन्यायाविरोधात लढण्याचे, गद्दारांना अद्दल घडवण्याचे, परस्त्री मातेसमान मानण्याचे, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करण्याचे, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू न देण्याचे तसेच स्वराज्याचे हित जपणारी उदार धार्मिक धोरणे राबवण्याचे असे अनेक मौल्यवान संस्कार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यावर मराठीजनांवर केले. भावी पिढ्यांना ही शिवमंदिरे महाराजांचे हे संस्कार आणि प्रेरणा देतील. लवकरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवशाही स्थापन झाल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे भव्य देखणे, प्रेरणादायी मंदिर उभारणार.

 

* २०३५ मध्ये आपल्या लढवय्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होतील. पुढच्या ११ वर्षांत महाराष्ट्राचा प्राचीन, मध्यमयुगीन आणि आधुनिक इतिहास तसेच प्रगतीशील व पुरोगामी संस्कृतीचे अद्भुत दर्शन घडवणारी आधुनिक लेणी साकारणार. पर्वताच्या दगडांमध्ये कोरलेली ही लेणी अवघ्या जगाचे लक्ष वेधून तर घेतीलच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपल्याला मराठी माणसाला पुढची हजारो वर्षे ‘आपण कोण’ याची प्रेरणादायी आठवण करुन देतील.

 

अन्नसुरक्षा

 

* शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता गहु, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर या ५ जीवनाश्यक वस्तुंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवणार.

 

* कष्टकऱ्यांना फक्त १० रुपयांत पोटभर, पौष्टिक जेवण देणाऱ्या शिवभोजन योजनेचा विस्तार करणार

महिला

 

* प्रत्येक पोलिस स्टेशनबरोबरीने २४४७ स्वतंत्र महिला पोलिस ठाणे सुरु करणार.

 

* राज्यात १८,००० महिला पोलिसांची भरती करणार.

 

* महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार.

 

* महिलांना एसटी तसेच बेस्ट, टीएमटी, पीएमपीएमएल, एनएमएमटी आदींमध्ये बस प्रवास मोफत करणार.

 

* महिलांना लोकल ट्रेनमधून मोफत प्रवासासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार.

शहरी आणि ग्रामीण भागात महिलांसाठी मोठ्या संख्येने स्वच्छतागृहे बांधणार.

 

* शाळांमधील विद्यार्थिनीच्या स्वच्छतागृहांसाठी महिला कर्मचारी बंधनकारक करणार.

 

* गरीब महिलांना आरोग्यविषयक स्वच्छतेसाठी अत्यल्प दरांत सॅनिटरी नॅपकिन देणार.

 

* असंघटित क्षेत्रातील लाखो महिलांना स्थिर व सुरक्षित / स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणार.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -