विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात येत आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्राचारार्थ नामदार अमित शहा यांची इचलकरंजी येथे श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौकात दुपारी 3.00 वाजता विराट जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष पै. अमृत भोसले व प्रकाश दत्तवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, विधानसभा निवडणूकिच्या प्रचारासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पहिल्यांदाच इचलकरंजीत येत आहेत. महायुतीचे इचलकरंजी विधानसभा उमेदवार राहुल आवाडे, शिरोळ विधानसभा उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर व हातकणंगले विधानसभा अशोकराव माने यांच्या प्रचाराचा शुभारंभ यानिमित्ताने होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात आजवर झालेल्या जाहीर सभापेक्षा ही विराट सभा होईल. येथून कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांची ही विजय संकल्प सभा ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भारत महासत्ता बनविण्यासाठी केंद्रासोबत राज्यातही महायुतीचे सरकार असणे आवश्यक आहे. त्याची सुरुवात इचलकरंजीतून या विजय संकल्प सभेतून होईल.
या सभेसाठी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर, इचलकरंजी विधानसभा निरिक्षक आमदार सौ. शशिकला जोल्ले, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील विविध प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. या सभेसाठी मतदार संघातील तमाम मतदार बंधूभगिनी यांनी उपस्थित राहावे.
पत्रकार परिषदेत प्रकाश मोरे, धोेंडीराम जावळे, प्रकाश पाटील, अनिल डाळ्या, रविंद्र लोहार, शहाजी भोसले, राजेश रजपुते, जयेश बुगड, संतोष शेळके आदी उपस्थित होते.