Saturday, December 21, 2024
Homeइचलकरंजीजुगार अड्डयावर छापा;सोळाजणांवर गुन्हा

जुगार अड्डयावर छापा;सोळाजणांवर गुन्हा

कबनूर परिसरातील जय भारत कला व क्रिडा सांस्कृतीक मंडळाच्या खोलीत बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या जुगार अड्डयावर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकुण ३ लाख १८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.

करमधील जयभारत सांस्कृतिक मंडळाच्या खोलीत पोपट लोंढे याचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी रात्री त्याठिकाणी छापा टाकला असता पोपट लोंढे याच्यासह १६ जण जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी मनोहर वसंत कांबळे (रा. आंबेडकर चौक), अरविंद सिद्ध धनगर (कबनुर), सुरेश दिनकर माने ( रा. कबनुर), चंद्रकांत विनायक सोनुर (रा. कबर हायस्कुल मागे), अमर तुकाराम बडे (पुजारी माळा), राकेश बाबासाहेब कुरणे (रा. आंबेडकर चौक), हजरत सज्जन सनदी (सनदी मळा), प्रमोद निवृत्ती कांबळे (आंबेडकर चौक), बबलु सिताराम आवळे (रा. कबनुर), सुशांत राजाराम कांबळे (रा.

३ लाख १८ हजाराचा मुद्देमाल जप्त

कबनूर परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड टाकण्याच्या दोन दिवसांपूर्वी सदर अड्डयावर एक टोळके शखाचे] धाक दाखवून तेथील रक्कम हिस्कावून घेऊन गेले. सदरचा प्रकार व्हायरल झाल्याने पोलिसांनी सदर जुगार अड्ड्यावर धाड टाकली मात्र, संबंधित टोळीवर कोणतीही कारवाई केल्याची समोर आले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्या टोळक्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

बुवाचे वाठार), अनिकेत आण्णाप्पा कांबळे (आंबेडकर चौक, कबनूर), इस कमरुद्दिन विजापुरे (रा. कबनूर शाळेमागे), संतोष दत्ता शिंदे (रा. रुई), विजय चंद्रकांत कानेटकर (रा. आंबेडकर चौक), कुमार महादेव धनवडे (रा. मराठी शाळेमागे, कबनुर) यांच्यासह जुगार अड्डा मालक पोपट लोंढे यांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख ९ हजार ८५० रुपये, १ लाख ३३ हजार रुपयांचे १३ मोबाईल, १ लाख ६० हजाराच्या ५ मोटरसायकली आणि जुगार साहित्यासह एकुण ३ लाख १८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -