Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानJio चा तुफानी प्लान, 98 दिवसांच्या रिचार्जने कोट्यवधी युजर्सला मोठा दिलासा

Jio चा तुफानी प्लान, 98 दिवसांच्या रिचार्जने कोट्यवधी युजर्सला मोठा दिलासा

रिलायन्स जिओच्या कोट्यवधी युजर्ससाठी कंपनीने आणखी एक प्लान लॉन्च केला आहे. रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशभरातील जवळपास 49 कोटी युजर्स हे जिओची सेवा वापरतात.

 

आपल्या युजर्ससाठी जिओकडून विविध रिचार्ज प्लान उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ज्यामध्ये स्वस्त आणि महाग असे दोन्ही प्लान्सचा समावेश आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि बजेटनुसार प्लान निवडू शकता.

 

तुम्ही जिओचे सिमकार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जिओने आपल्या रिचार्ज प्लानच्या किमती वाढवल्यापासून युजर्स स्वस्त आणि मस्त असे रिचार्ज प्लान शोधत आहेत. जिओकडे विविध प्लान्स उपलब्ध आहेत. त्यातच आता जिओने आपल्या लिस्टमध्ये आणखी एक रिचार्ज प्लान अॅड केला आहे. यामध्ये युजर्सला 3 महिन्यांपेक्षा जास्त म्हणजेच 98 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. केवळ दीर्घकाळाची व्हॅलिडिटीच नाही तर इतर फायदे सुद्धा या प्लानमध्ये मिळतात.

 

जिओचा अप्रतिम रिचार्ज प्लान

 

रिलायन्स जिओच्या या प्लानची किंमत 999 रुपये इतकी आहे. या प्लानने रिचार्ज करुन तुम्ही तीन महिन्यांहून अधिक काळ आपला फोन अॅक्टिव्ह ठेवू शकता आणि जिओच्या सेवांचा लाभ घेऊ शकता. जिओच्या 999 रुपयांच्या या प्लानमध्ये युजर्सला 98 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या काळात तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर 98 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग करु शकता.

 

या प्लानमध्ये युजर्सला एकूण 196GB डेटा 98 दिवसांसाठी मिळतो. तुम्ही दररोज 2GB पर्यंत हाय स्पीड डेटा वापरू शकता. यासोबतच जिओचा हा रिचार्ज ट्रू 5G प्लानचा एक भाग आहे त्यामुळे युजर्सला अनलिमिटेड 5G डेटा मिळतो. 5G डेटा वापरण्यासाठी तुमच्या परिसरात 5G कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे.

 

ओटीटी बेनेफिट्स

 

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला इतर नियमित प्लानप्रमाणे काही अतिरिक्त फायदे मिळतात. तुम्ही ओटीटी स्ट्रिमिंग करत असाल तर तुम्ही Jio Cinema लाभ घेऊ शकता. यासोबतच जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला Jio TV आणि jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -