Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्र10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती ! बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती ! बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यावर्षीच्या दहावी आणि बारावीचा बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा समोर आलेल्या आहेत. त्यानुसार यावर्षी 10 दिवस अगोदर परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना आता अभ्यासाला देखील कमी वेळ राहिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लगेच अभ्यासाला जागा. कारण बारावीची परीक्षा येत्या 11 फेब्रुवारीपासून आणि दहावीची परीक्षा येते 31 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी फक्त तीन महिन्याचा कालावधी राहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी नियोजन करून अभ्यास करा.

 

दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा आली की, विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या मनात देखील भीती असते. अनेक वेळा परिक्षेदरम्यान अनेक अडचणी येतात. परंतु आता तुमच्याकडे अजूनही तीन महिन्यांचा कालावधी आहे. तुम्ही या तीन महिन्यांच्या कालावधीत चांगले नियोजन करून अभ्यास करू शकता. इयत्ता दहावीचा पहिला पेपर मराठी, हिंदी तसेच इतर प्रथम भाषांचा असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.

 

यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा केंद्र होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तात्पुरते परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्यावर त्यातून राज्यभरातून हरकती मागवल्या आहेत. या संदर्भात केवळ 40 हरकती प्राप्त झालेल्या आहेत. आणि त्या किरकोळ स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे बोर्डाने केलेले हे नियोजन अंतिम ठरवलेले आहे.

 

यावर्षी परीक्षा अगोदर घेतल्यामुळे बारावी नंतर जेईई, नीट च्या परीक्षा देखील लवकर होणार आहेत. तसेच परीक्षांचा निकाल देखील यावर्षी पंधरा-वीस दिवस अगोदर लागण्याची शक्यता आहे. निकाल लवकर लागल्यामुळे पुरवणी परीक्षा वेळेत होईल, आणि विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशास अडचण येणार नाही.

 

परीक्षेचे वेळापत्रक | 10 th And 12 th Exam

इयत्ता बारावी

प्रात्यक्षिक परीक्षा – 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी

लेखी परीक्षा – 11 फेब्रुवारी ते 18 मार्च

 

इयत्ता दहावी

प्रात्यक्षिक परीक्षा -3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी

लेखी परीक्षा – 21 फेब्रुवारी ते 17 मार्च.

 

तुम्ही महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण वेळापत्रक पाहू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती पाहायला मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -