Thursday, November 21, 2024
Homeतंत्रज्ञानआता WhatsApp वरही करता येणार कॉल रेकॉर्ड; वापरा ही ट्रिक  

आता WhatsApp वरही करता येणार कॉल रेकॉर्ड; वापरा ही ट्रिक  

आजकाल टेक्नॉलॉजीने खूप जास्त प्रगती केलेली आहे. या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण घरबसल्या जगभरातील माहिती मिळवू शकतो. यासाठी मोबाईल हा केंद्रबिंदू असतो. आपण मोबाईलच्या माध्यमातूनच या प्रगत टेक्नॉलॉजीचा अनुभव घेतो. आजकाल जवळपास सगळे स्मार्टफोन वापरतात आणि स्मार्टफोन वापरणारा प्रत्येक माणूस हा व्हाट्सअपचा वापर करतच असतो. व्हाट्सअप हे एक असे समाज माध्यम आहे जर लोकांना एकमेकांशी कनेक्ट करते. आपण घरबसल्या कितीही दूरच्या व्यक्तीशी या व्हाट्सअपच्या माध्यमातून बोलू शकतो. केवळ भारतात नाही तर संपूर्ण जगभरात व्हाट्सअप वापरले जाते.

 

व्हाट्सअपच्या माध्यमातून आपल्याला फोन कॉल, व्हिडिओ कॉल, मेसेज, फोटो, व्हिडिओ यासारख्या गोष्टी सेंड करता येतात. तसेच आपण लोकेशन शेअर देखील करू शकतो. तसेच आजकाल व्हाट्सअपच्या माध्यमातून आपण ऑनलाइन पद्धतीने पेमेंट देखील करतो. व्हाट्सअप त्यांच्या युजरसाठी नवनवीन फीचर लॉन्च करत असतात. आपण आता व्हाट्सअप वर आलेले कॉल रेकॉर्ड करू शकतो. आता याबाबत आम्ही एक ट्रिक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमचे फोन रेकॉर्डिंग करू शकता.

 

ज्याप्रमाणे आपण नॉर्मल फोन रेकॉर्ड करतो. तसे व्हाट्सअप वर कॉल रेकॉर्ड करणे शक्य नव्हतं. परंतु आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही हे फोन कॉल रेकॉर्ड करू शकता. व्हाट्सअपवर असं कोणतही इनबिल्ट फीचर नाही. पण तुम्ही क्यूबएससीआर आणि सेलेस्ट्रल यांसारख्या थर्ड पार्टी ॲपद्वारे व्हाट्सअपवर आलेले कॉल रेकॉर्ड करू शकता.

 

यासाठी तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या फोनमध्ये थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग ॲप डाऊनलोड करायचे आहे. whatsapp कॉल रेकॉर्ड करता येतात. यासाठी व्हाट्सअप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला आवश्यक त्या सगळ्या परवानगी द्याव्या लागेल. जसे की मायक्रोफोन, स्टोरेजमध्ये प्रवेश त्यानंतर व्हाट्सअपवर केलेले कॉल सहज रेकॉर्ड करू शकता. परंतु हे थर्ड पार्टी ॲप डाऊनलोड करताना तुम्ही त्यांची गोपनीयता, धोरणे आणि नियम वाचूनच डाउनलोड करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -