Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीमतदानाच्या दोन दिवसआधी भाजपचा मोठा डाव, ठाकरे गटाला धक्का

मतदानाच्या दोन दिवसआधी भाजपचा मोठा डाव, ठाकरे गटाला धक्का

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. विधानसभा(assembly) निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजपनं शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

 

उद्धव ठाकरे गटाला वाशिममध्ये मोठा धक्का बसला आहे. वाशिम विधानसभा(assembly) मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी असलेले राजाभैय्या पवार आणि युवासेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 

यातील राजाभैय्या पवार यांनी आधीच बंडखोरी केली होती, ते वाशिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा ऐन विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटालासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

 

 

दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपनं मनसेला देखील धक्का दिला आहे. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सभागृह नेते दिलीप दातीर यांनी ऐनवेळी भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांना पाठिंबा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -