Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगनामांकित हॉटेलमध्ये सापडले 5 कोटी, राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त

नामांकित हॉटेलमध्ये सापडले 5 कोटी, राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडत आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यातच आज विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडत असल्याचे दिसत आहेत. एकीकडे प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे.

 

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वत्र पोलिसांचा तसेच निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. त्यातच आता नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहेत. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. ही रक्कम पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे यावेळी एका राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे.

 

पोलिसांकडून चौकशी सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून आज सकाळच्या सुमारास या हॉटेलवर छापेमारी करण्यात आली होती. यावेळी पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले. सध्या पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

 

याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची कसून चौकशी सुरु आहे. तसेच इतकी मोठी रक्कम कुठून आणि का आणली? हे पैसे कुणी दिले? कशासाठी दिले? यासारखे अनेक प्रश्न सध्या पोलिसांकडून केले जात आहेत.

 

जळगाव, नागपूर आणि मुंबईतही सापडलं घबाड

तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचारचा आज अखेरचा दिवस असल्याने निवडणूक आयोगाचे पथक अधिक सक्रीय झाले आहे. शनिवारी मुंबईत 80 कोटींची चांदी जप्त करण्यात आली होती. या पाठोपाठ नागपूर आणि जळगावात कोट्यवधी रुपये किंमतीचे सोने आणि चांदी जप्त करण्यात आली. नागपुरात जप्त केलेल्या सोन्या चांदीची किंमत 14 कोटी इतकी आहे. तर जळगावात जप्त केलेल्या सोने, चांदीची किंमत पाच कोटी 59 लाख 61 रुपये आहे.

 

नाशिकमध्ये मोठी कारवाई

 

दरम्यान नाशिकमध्ये आतापर्यंत रोकड, मद्य आणि इतर बाबींचा मिळून तब्बल ७३ कोटी ६० लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी ४४५७ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच नाशिक ९९५.११ लाख रुपये, धुळ्यात १९५३.३२ लाख, जळगाव ८९०.२५ लाख, नंदुरबार – ४१७.९२ आणि अहिल्यानगर-3131.08 रुपये जप्त करणअयात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -