Wednesday, March 12, 2025
HomeBlogAUS vs PAK : पाकिस्तानी खेळाडूची डेब्यू सामन्यातच पॅन्ट निघाली, कधीच विसरणार...

AUS vs PAK : पाकिस्तानी खेळाडूची डेब्यू सामन्यातच पॅन्ट निघाली, कधीच विसरणार नाही, पाहा व्हीडिओ

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह पाकिस्तानला 3-0 ने क्लिन स्वीप केलं. मालिकेतील तिसऱ्या सामन्यातून पाकिस्तानच्या जहांदाद खान याने पदार्पण केलं. अनेक खेळाडूंना पदार्पणात अविस्मरणीय कामगिरी करण्याचा प्रयत्न असतो. मात्र जहांदाद खान पदार्पणातील सामना कधीच विसरणार नाही. जहांदाद खान पहिल्याच सामन्यात ट्रोल झाला आहे. जहांदादची लाईव्ह सामन्यात पॅन्ट घसरली. जहांदादच्या पॅन्ट उतरल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पॅन्ट उतरली

ऑस्ट्रेलियाच्या डावातील पहिली ओव्हर शाहीन अफ्रिदी याने टाकली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने अफ्रिदीने टाकलेला बॉल फटकावला. जहांदाद ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने मारलेला बॉल रोखण्यासाठी सीमारेषेच्या दिशने जीव तोडून धावत निघाला. जहांदादने डाईव्ह मारुन बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात जहांदादची पॅन्ट घसरली. त्यामुळे जहांदादची मैदानात फजिती झाली. जहांदाद बॉल रोखण्यात अपयशी ठरल्याने चौकार गेला. त्यानंतर जहांदादने घसरलेली पॅन्ट सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जहांदादने उभं राहून पॅन्ट टाईट बांधली.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : जोश इंग्लिस (कर्णधार आणि विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन आणि ॲडम झम्पा.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : आगा सलमान (कर्णधार), साहिबजादा फरहान, बाबर आझम, हसीबुल्ला खान (विकेटकीपर), उस्मान खान, इरफान खान, अब्बास आफ्रिदी, शाहीन आफ्रिदी, जहांदाद खान, हरिस रौफ आणि सुफियान मुकीम.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -