Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रआता वयाच्या 40 व्या वर्षी मिळेल पेन्शन, LIC चा 'हा' भन्नाट प्लॅन...

आता वयाच्या 40 व्या वर्षी मिळेल पेन्शन, LIC चा ‘हा’ भन्नाट प्लॅन आहे तरी काय?

एलआयसीच्या सरल पेन्शन प्लॅनच्या (LIC Saral Pension Plan) मदतीने तुम्हाला वयाच्या 40 वर्षांपासूनच पेन्शन मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला 60 वर्षे होण्याची वाट पाहण्याची गरज नाही.

 

तुम्हाला या प्लॅनअंतर्गत फक्त एकदाच पैसे भरायचे आहेत. विशेष म्हणजे पैसे भरल्यानंतर लगेच तुम्हाला पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल. पुढे संबंधित व्यक्तीचे निधन होईपर्यंत हे पेन्शन मळत राहते. मृत्यू झाल्यानंतर भरलेली रक्कम नॉमिनीला परत केली जाते.

 

या प्लॅनअंतर्गत तुम्हाला दोन प्रकारे पैसे भरता येतात. सिंगल लाईफ या पर्यायाचा वापर केल्यास पॉलिसिधारक जिवंत आहे, तोपर्यंत त्या व्यक्तीला पेन्शन दिले जाते. पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर ती रक्कम नॉमिनीला परत केले जातात.

 

तर जॉईंट लाईफ हा पर्याय निवडल्यास पती-पत्नी हे दोघेही यात कव्हर होतात. एका प्रायमरी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास दुसऱ्या सदस्याला हे पेन्शन दिले जाते. दोघांचाही मृत्यू झाल्यास नॉमिनीला उरलेले पैसे परत केले जातात.

 

या प्लॅनअंतर्गत तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये तर जास्तीत जास्त कितीही पैसे गुंतवता येतात. तुम्ही गुंतवलेल्या पैशांच्या तुलनेत तुम्हाला पेन्शन दिले जाते. वयाच्या 40 ते 80 वर्षापर्यंत तुम्ही या प्लॅनमध्ये गुंतवणूक करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -