Sunday, June 1, 2025
Homeमनोरंजनलाडक्या बहिणीसाठी मोठी गुडन्यूज! फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात मांडला 'हा' प्रस्ताव

लाडक्या बहिणीसाठी मोठी गुडन्यूज! फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात मांडला ‘हा’ प्रस्ताव

मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी या पुरवणी मागण्या मांडल्या, ह्या मागण्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनातील योजनांच्या निधी वाटपाबाबत सरकारने अतिरिक्त निधी मागितला आहे.

 

2.5 कोटींहून अधिक महिलांना मिळाले मासिक हप्ते

 

गेल्या अर्थसंकल्पात, राज्य सरकारने लाडकी बहिन योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना 1,500 रुपये मासिक भत्ता देण्यासाठी वार्षिक 46,000 कोटी रुपयांची घोषणा केली होती. यानुसार, 2.5 कोटींहून अधिक महिलांना मासिक हप्ते मिळाले आहेत. मासिक हप्ते 1,500 रुपयांवरून 2,100 रुपयांपर्यंत वाढवून बजेट तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले होते.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 36 कोटी रुपयांची तरतूद

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 36 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला होता. आता त्यासाठी नवीन पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आज पुरवणी मागणी करण्यात आली आहे.

 

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी 3,050 कोटी रुपयांची पुरवणी मागणी

 

सरकारने पात्र साखर सहकारी कारखान्यांसाठी मार्जिन मनी कर्जासाठी रुपये 1,204 कोटी आणि 7.5 अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप असलेल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा योजनेसाठी 3,050 कोटी रुपयांची पुरवणी मागणी केली आहे.

 

या विभागांच्याही निधीसाठी पुरवणी मागण्या

 

विविध विकास कामे आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला 7,490 कोटी रुपये, उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाला 4,112 कोटी रुपये, शहरी विकासाला 2,774 कोटी रुपये, ग्रामीण विकासाला 2,007 कोटी रुपये आणि आदिवासी विकास विभागाला 1,830 कोटी रुपये निधी देण्याबाबत पुरवणी मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -