आजकाल सगळे लोक हे भविष्याचा विचार करून काही ना काही गुंतवणूक करत ठेवत असतात. सध्या मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. अनेक लोक हे म्युच्युअल फंड त्याचप्रमाणे एफडीमध्ये गुंतवणूक करतात. त्याचप्रमाणे आजकाल पोस्ट ऑफिसमध्ये देखील गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कारण पोस्ट ऑफिसमधील तुमचे पैसे हे सुरक्षित असतात. तसेच यावर चांगला परतावा मिळतो. इतर अनेक फायदे देखील मिळतात. तसेच सेविंग अकाउंट सारखा इतर सर्व सुविधा देखील पोस्ट ऑफिसच्या खात्यातून आपल्याला मिळतात. आता या पोस्ट ऑफिसच्या सेविंग अकाउंटबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
500 रुपयात अकाउंट चालू करा
जर तुम्ही सेविंग अकाउंट उघडत असाल तर पोस्टमध्ये किंवा बँकेत देखील या सेविंग अकाउंटमध्ये कमीत कमी बॅलन्स असणे गरजेचे असते. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागतो. बँकांमध्ये तुम्ही सेविंग अकाउंट उघडले, तर त्यात तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये ठेवावे लागतात. परंतु पोस्ट ऑफिसच्या सेविंग अकाउंट मध्ये तुम्ही 500 रुपये भरून देखील अकाउंट चालू करू शकता.
पोस्ट ऑफिसच्या सेविंग अकाउंटवर तुम्हाला बँके सारख्या इतर अनेक सुविधा देखील मिळतात. तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम कार्ड मिळते. मोबाईल बँकिंग, आधार लिंकिंग या सर्व सुविधा तुम्हाला मिळतात. तसेच तुम्ही या अकाउंटवर सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री योजनांचा देखील फायदा घेऊ शकता. सर्व बचत खात्यांमधून आर्थिक वर्षात तुम्ही 10 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर करप्राप्त उत्पन्नातून सूट दिली जाते.
तुम्ही बँकेच्या सेविंग अकाउंटमध्ये रक्कम जमा करते. त्याचे वेळोवेळी व्याज देखील दिले जाते. परंतु हे व्याजदर साधारणता 2.70 ते 3.5 टक्के एवढे असते. परंतु पोस्ट ऑफिसच्या सेविंग अकाउंटवर तुम्हाला बँकेपेक्षा जास्त व्याजदर मिळते. पोस्ट ऑफिसमध्ये कोणताही प्रौढ व्यक्ती अकाउंट चालू करू शकते. तसेच दोन लोक एकत्र जॉईंट अकाउंट देखील चालू करू शकतात. तसेच 10 वर्षांवरील अल्पवयीन व्यक्ती स्वतःच्या नावावर खाते चालू करू शकतात.