Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रआजपासून 2 जानेवारीपर्यंत देशात ‘राष्ट्रीय दुखवटा’! सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

आजपासून 2 जानेवारीपर्यंत देशात ‘राष्ट्रीय दुखवटा’! सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

देशाचे माजी पंतप्रधान(Prime Minister) मनमोहन सिंग यांचं गुरुवारी, 26 डिसेंबर रोजी दिल्लीमधील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झालं. दोन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवणाऱ्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांपर्यंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांपासून ते अनेक प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे.

 

जातात. राज्य पातळीवरही शासकीय दुखवटा जाहीर केला जातो. राज्यस्तरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय असो किंवा दुखवटा जाहीर करण्याचा निर्णय असो तो राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून घेतात. त्यानंतर निर्णय जाहीर केला जातो.

 

राष्ट्रीय दुखवट्याच्या कालावधीमध्ये सामान्यपणे पहिल्या दिवशी सुट्टी जाहीर केली जाते. मात्र दरवेळेस असं होतं असं नाही. सुट्टी देण्याचा निर्णय हा सरकारी पातळीवर होतो. राष्ट्रीय दुखवटा हा राजकीय असल्याने थेट सर्वसामान्यांवर त्याचा काही परिणाम होत नाही. राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात कोणतेही शासकीय कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत. त्यामुळेच सरकारी योजनांअंतर्गत काही विशेष कार्यक्रम आयोजित केले असताना राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्याचे हे कार्यक्रम पुढे ढकलेले जातात. दैनंदिन व्यवहारांवर राष्ट्रीय दुखवट्याचा काही परिणाम होत नाही. शासकीय कार्यालये आणि कामं नियमिपणे सुरु असतात.

 

2013 साली दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष भारतरत्न नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला. 2018 साली द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला गेलेला. याच वर्षी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला.

 

2019 मध्ये गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला गेलेला. पुढल्या वर्षी म्हणजेच 2020 साली भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला गेलेला. 2021 साली गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -