Friday, February 14, 2025
Homeराजकीय घडामोडीमहायुतीत नाराजीनाट्य कायम; मंत्रिपद मिळूनही 'या' मंत्र्यांनी अद्याप स्वीकारला नाही पदभार

महायुतीत नाराजीनाट्य कायम; मंत्रिपद मिळूनही ‘या’ मंत्र्यांनी अद्याप स्वीकारला नाही पदभार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल मागील महिन्यात समोर आले. यामध्ये भाजप-महायुतीला चांगले यश मिळाले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकारही स्थापन झाले आहे.

 

यामध्ये भाजपच्या अनेक नेत्यांना मंत्रिपदं देण्यात आली तर काहींना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले. पण, मंत्रिपद मिळूनही अनेक मंत्र्यांनी आपला पदभार अद्याप स्वीकारला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही नेतेमंडळी अद्याप नाराज असल्याचे दिसून येत आहे.

 

नागपुरात झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, अधिवेशन संपल्यानंतर या मंत्र्यांच्या खात्यांची घोषणा करण्यात आली. परंतु, 17 मंत्र्यांनी मुंबईत पोहोचून पदभार स्वीकारलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मंत्री क्रीमी पोर्टफोलिओ न मिळाल्याने नाराज आहेत. तर अनेक मंत्री नववर्ष साजरे करण्यासाठी सुट्टीवर गेले आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पदभार स्वीकारल्यापासून कामात व्यस्त आहेत.

 

शिंदे यांचाही झाला भ्रमनिरास

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पुन्हा मुख्यमंत्री न केल्याने भ्रमनिरास झाला आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर ते सुटीसाठी सातारा या गावी गेले होते. यानंतर, नुकतीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ते संपूर्ण कुटुंबासह सुट्टीच्या मूडमध्ये आहेत. नवीन सरकारमध्ये घेण्यावर नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खाते मिळाले आहे. शिंदे आणि पीएम मोदी यांच्या दिल्लीत झालेल्या भेटीनंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत. नव्या सरकारमध्ये महत्त्वाचे खाते न मिळाल्याने माजी मुख्यमंत्र्यांनी मोदींकडे नाराजी व्यक्त केल्याचे मानले जात आहे.

 

मंत्री भरणेही नाराज

 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कॅबिनेटमंत्री दत्तात्रय भरणे हेही आवडते खाते न मिळाल्याने नाराज आहेत. त्यांना नव्या सरकारमध्ये क्रीडामंत्री करण्यात आले आहे. अन्य मंत्री ज्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यात दादा भुसे यांच्यासह शिंदे गटाच्या अनेक मंत्र्यांचा समावेश आहे.

 

छगन भुजबळही संतापले

 

महाआघाडी सरकारमध्ये मंत्री न केल्याने अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळही नाराज आहेत. त्यामुळेही महायुती सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. आता नवीन वर्षाचा सोहळा आटोपल्यानंतरच आणखी अनेक मंत्री पदभार स्वीकारतील, असे मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -