गेल्या काही दिवसांपासून राज्यात पारा कमी झालेला पाहायला मिळत होता. त्यातून महाराष्ट्रात अनेक भागात कडाक्याची थंडी होती. परंतु अनेक भागात तापमान वर खाली होताना दिसत होते
मुंबईकरांना तर उकाड्यालाही सामोरे जावे लागत होते. परंतु आता पुढील पाच दिवस तरी हा उकाडा कायम राहणार असल्याचे कळते आहे. त्यामुळे अनेक भागात गायब झालेला गारठा वाढणार आहे.
राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक भागात थंडी गायब झाली होती आणि तापमानात वाढ झाली होती. फक्त पहाटेच्या वेळी हवेत किंचित गारवा पाहायला मिळत होता आणि दिवसा उन्हाची झळ बसत होती. मुंबईकरांना याचा फटका बसला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हवेत गारवा पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्रीपासूनच हवेत गारवा निर्माण झालेला जाणवत होता. गुरूवारी किमान तापमानाचा पारा 13.4 अंशांपर्यंत घसरला. शुक्रवारपासून पुढील 5-6 दिवस थंडी वाढणार आहे.
राज्यातील किमान तापमान
पुणे : 11.7
नगर : 10.4
कोल्हापूर : 16.5
महाबळेश्वर : 12.8
नाशिक : 11.3
सातारा : 14.6
मुंबई : 21.5
धाराशिव : 13.0
बीड : 10.9
नागपूर : 9.0
गोंदिया : 8.8
विदर्भात थंडी
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात सकाळपासून थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका कमी जास्त होत आहे. दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी कमाल तापमान कायम दिसत असून उत्तर भारतातील तापमानात घट होऊ शकते. राज्यामध्ये काही ठिकाणी सकाळी धुक्याची चादर पहायला मिळत आहे. शुक्रवारी दुपारी उन्हाचा कडाका जाणवत होता. मुंबईकरांना याचा फटका बसला. राज्यात पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी 3 ते 4 अंश सेल्सिअसची घट होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भात नागपूरमध्ये 2 जानेवारीला 9 अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्येही सर्वात कमी तापमान आहे.
मुंबईत उष्णता?
मुंबई शहर आणि उपनगरात कोरडं हवामान असेल. इथे आता उन्हाचा कडाका वाढणार आहे. मुंबईचे कमाल तापमान काल 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज होता. मागील काही दिवसांपासून वाढ झालेल्या मुंबईतील किमान तापमानाच्या पाऱ्यात शुक्रवारी घट जरी झाली असली तरी कमाल तापमानाचा पारा मात्र चढाच होता. शुक्रवार हा तब्बल सात वर्षांतील जानेवारी महिन्यातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला. सांताक्रूझ येथे शुक्रवारी 36 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
पुणे, नाशिक गारठलं
पुण्यात पडलेलं धुकं आता विरळ होतंय. परंतु थंडीचा जोर मात्र कायम राहिला आहे, असे कळते. पुण्याचे कमाल तापमान काल 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता होती. येत्या दिवसातही हा जोर वाढेल. उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. काल कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 14 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज होता. आताही हे तापमान सलग तसंच राहणार आहे.