लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजून सातवा हप्ता आला नाही. सातव्या हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे. सरकारने सहावा आणि सातवा हप्ता उशिरा जाहीर केला. या दरम्यान ज्या भागातून तक्रारी आल्या तिथे फेरतपासणीचे आदेश दिले.
त्यातच आता साडेचार लाख महिलांनी योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज मागे घेतले आहेत. लाडकी बहीण योजनेबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.
2100 रुपयेकधीमिळणार?
महायुती सरकार लाडक्या बहिनींना मार्च महिन्यातील बजेटमध्ये 2100 रूपये हप्ता सुरू करणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील बोलताना म्हणाले.
महायुती सरकार बहिनींना दूर करणार नसल्याचा विश्वास विखे पाटील यांनी दिला. बजेटमध्ये प्रस्ताव मांडून तो मंजूर होईल त्यानंतर लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची अहिल्यानगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पुन्हा वर्णी लागल्याने शिर्डी परीसरातील नागरीकांच्या वतीने त्यांची भव्य मिरवणूक काढत नागरी सत्कार करण्यात आला होता.
या सत्कार सोहळ्यात बोलताना विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींना सरकार दूर करणार नसल्याचा विश्वास देत येत्या मार्चमहिन्यात होणा-या अधिवेशनात हप्ता 1500 वरून 2100 करणार असल्याचं ते म्हणाले.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
ज्या लाडक्या बहिणी फेरतपासणीत अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडून कोणतेही पैसे परत घेतले जाणार नाहीत. त्यांचे अर्ज बाद होतील. त्यांना या पुढच्या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ज्या महिला अपात्र ठरल्या त्यांच्याकडून कोणतीही रक्कम वसूल केली जाणार नाही, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. त्यांचे अर्ज बाद केले जातील. त्यांना या पुढच्या योजनांचा लाभ मिळणार नाही असं आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शासनानं कोणताही लाभ परत घेतला नाही.